कचराकुंडी : वास्तुशास्त्रानुसार घराच्या मुख्य दरवाजाबाहेर उंबरठ्याशेजारी कचराकुंडी ठेवणे टाळावे. दाराच्या तोंडाशी काही कचरा-घणा पडलेली असू नये. कारण याचा वाईट परिणाम घरातील लोकांवर होतो. लोकांना अनेक प्रकारचे आजार होऊ शकतात. दारात स्वच्छता ठेवल्याने तुमच्या जीवनावर सकारात्मक परिणाम होईल. (इमेज-कॅनव्हा)
शूज आणि चप्पल : शूज आणि चप्पल घराबाहेर ठेवणे अत्यंत अशुभ मानले जाते. वास्तुशास्त्रानुसार घराच्या मुख्य दरवाजातून देवी लक्ष्मीचे आगमन होते. दारात उंबरठ्याशी चप्पल आणि जोडे ठेवल्यास देवी लक्ष्मीचा कोप होऊ शकतो. माता लक्ष्मीची कृपा राहण्यासाठी दरवाजा, उंबरठा स्वच्छ-नीटनेटका ठेवण्यासोबतच शूज आणि चप्पल तिथं ठेवणं टाळावं. (इमेज-कॅनव्हा)
झाडू : वास्तुशास्त्रानुसार झाडूला लक्ष्मी मानतात. झाडूला चुकून पाय लागणं चांगलं मानलं जातं नाही. यामुळे आर्थिक संकटातून जावे लागू शकते. त्यामुळे घराबाहेर झाडू ठेवणे टाळावे. दारात, उंबरठ्याशी झाडू पडला असेल तर त्याला पाय लागण्याची शक्यता असते. (इमेज-कॅनव्हा)
विजेचा खांब: वास्तुशास्त्रानुसार, दारात विजेचा खांब असणे देखील अशुभ मानले जाते. असे मानले जाते की, घराबाहेर दारात विजेचा खांब असल्यास घरातील महिलांवर वाईट परिणाम होतो. यासोबत घरातील सकारात्मर गोष्टी थांबतात, असे मानले जाते. (इमेज-कॅनव्हा)
मनी प्लांट : घरात मनी प्लांट लावणे खूप शुभ मानले जाते. पण, दारात मनी प्लांट ठेवणे अशुभ मानले जाते. असे केल्याने घरात नकारात्मक शक्ती वास करतात. संपत्तीची कमतरता देखील निर्माण होऊ शकते. (इमेज-कॅनव्हा) (सूचना : येथे दिलेली माहिती धार्मिक श्रद्धेवर आधारित आहे. याला कोणताही शास्त्रीय पुरावा नाही. न्यूज 18 लोकमत त्याची हमी देत नाही.)