अक्षय्य तृतियेची पूजा
मुंबई, 19 एप्रिल : यंदाची अक्षय्य तृतीया शनिवार, 22 एप्रिल रोजी साजरी होणार आहे. अक्षय्य तृतीयेच्या मुहूर्तावर सोने, चांदी, जव, नारळ आदींची जेवढी खरेदी महत्त्वाची आहे, तेवढीच महत्त्वाची श्रीयंत्राची पूजा आणि प्रतिष्ठापनाही आहे. अक्षय्य तृतीयेच्या दिवशी या वस्तू विकत घेतल्यास अक्षय पुण्य प्राप्त होते आणि श्रीयंत्राचे पूजन केल्याने देवी लक्ष्मीची कृपा प्राप्त होते, असे मानले जाते. यामुळे संपत्तीत वाढ होते आणि व्यक्तीकडे पैशाची कमतरता राहत नाही. श्रीयंत्र हे लक्ष्मीचे प्रतीक मानले जाते. अक्षय्य तृतीयेच्या दिवशी लक्ष्मी देवीची मिळालेली कृपा आयुष्यभर टिकते, त्यात कोणतीही कमतरता येत नसते, म्हणून अक्षय्य तृतीयेच्या दिवशी श्रीयंत्राची स्थापना करून पूजा करावी. श्री कल्लाजी वैदिक विद्यापीठाच्या ज्योतिष विभागाचे प्रमुख डॉ. मृत्युंजय तिवारी यांना श्रीयंत्राची स्थापना, पूजा पद्धत आणि लक्ष्मी महामंत्र याविषयी दिलेली माहिती पाहुया. अक्षय्य तृतीया 2023 श्रीयंत्राचे फायदे - अक्षय्य तृतीयेच्या मुहूर्तावर श्रीयंत्राची स्थापना व पूजा केल्यानं घरात धनाचा ओघ वाढतो. पैशाची कधीच कमतरता राहत नाही. व्यवसायात प्रगती होते, गरिबी दूर होते. धनलाभाचे योग बनतात.
श्रीयंत्र प्रतिष्ठापना व पूजा पद्धत - श्रीयंत्राची प्रतिष्ठापना पूजास्थान, तिजोरी, व्यवसायाची जागा इत्यादी ठिकाणी करता येते. श्रीयंत्राची नित्य पूजा करावी. अक्षय्य तृतीयेचा दिवस श्रीयंत्राच्या स्थापनेसाठी अतिशय शुभ आहे. या दिवशी केलेल्या सत्कर्माचे पुण्य सदैव राहते. अक्षय्य तृतीयेच्या दिवशी पूजेचा शुभ मुहूर्त 07:49 ते दुपारी 12:20 पर्यंत आहे. यावेळी पूजेच्या ठिकाणी लाल किंवा गुलाबी रंगाचे कापड एका छोट्या चौरंगावर पसरवावे. त्यावर श्रीयंत्र ठेवा. त्यानंतर देवी लक्ष्मीचे स्मरण करून लाल फुले, अक्षत, कमळगट्टा, चंदन, धूप, दिवा इत्यादींनी श्रीयंत्राची पूजा करावी. श्रीयंत्राच्या उजव्या बाजूला तुपाचा दिवा ठेवावा. त्यासोबतच लक्ष्मीची पूजा करा. पांढरी बर्फी, खीर आणि बताशे अर्पण करा. लक्ष्मी महामंत्र - पूजेनंतर देवी लक्ष्मीच्या मंत्रांचा जप करा. महालक्ष्मी मंत्र ओम श्रीं क्लीं महालक्ष्मी महालक्ष्मी एह्येहि सर्व सौभाग्यं देहि मे स्वाहा, असा आहे. त्याचा किमान 108 वेळा जप करा. किंवा ओम श्रीं ह्रीं श्रीं कमले कमलालये प्रसीद प्रसीद श्रीं ह्रीं श्रीं ओम महालक्ष्मी नमः या मंत्राचा जप करा. या दोन मंत्रांचा कमळगट्टा माळाने जप करा. यामुळे तुमच्या सुख-समृद्धीमध्ये अपार वाढ होईल आणि तुम्हाला देवी लक्ष्मीचा आशीर्वाद मिळेल. हे वाचा - तुळशीची 11 पाने बदलतील तुमचे नशीब, मनातील अपूर्ण इच्छा क्षणात होईल पूर्ण श्रीयंत्राची पूजा केल्यानंतर लक्ष्मी आणि गणेशाची आरती करावी. तो दिवा संपूर्ण घरात फिरवावा. पूजेनंतर श्रीयंत्र तिजोरीत किंवा पूजेच्या ठिकाणी ठेवा आणि नित्य पूजा करा. हे वाचा - सरकारी नोकरीचा योग यायला कुंडलीत ग्रहांची ‘अशी’ बैठक जुळायला लागते (सूचना : येथे दिलेली माहिती धार्मिक श्रद्धेवर आधारित आहे. याला कोणताही शास्त्रीय पुरावा नाही. न्यूज 18 लोकमत त्याची हमी देत नाही.)