JOIN US
मराठी बातम्या / अध्यात्म / Akshay Tritiya 2023: अक्षय्य तृतीयेला अशा गोष्टी करणं अशुभ! भोगावे लागू शकतात आयुष्यभर परिणाम

Akshay Tritiya 2023: अक्षय्य तृतीयेला अशा गोष्टी करणं अशुभ! भोगावे लागू शकतात आयुष्यभर परिणाम

Akshay Tritiya 2023: अक्षय्य तृतीयेला लोक सुख, समृद्धी, वैभव, धन आणि ऐश्वर्य वाढवण्यासाठी अनेक उपाय करतात, परंतु या दिवशी काही अशा गोष्टी आहेत ज्या करू नये, कारण यामुळे देवी लक्ष्मी नाराज होऊ शकते आणि तुम्हाला आर्थिक समस्यांना सामोरं जावं लागू शकतं.

जाहिरात

अक्षय्य तृतियेला काय करू नये

संबंधित व्हिडिओ
जाहिरात
News18 लोकमत व्हॉट्सअ‍ॅप चॅनलला फॉलो करा

मुंबई, 13 एप्रिल : वैशाख शुक्ल तृतीया तिथीला अक्षय्य तृतीया साजरी केली जाते. यावर्षी अक्षय्य तृतीया 22 एप्रिलला आहे. या दिवशी लोक सोने-चांदीची खरेदी करतात आणि इतर मौल्यवान वस्तू आपल्या घरी आणतात, जेणेकरून अक्षय्य तृतीयेला कमावलेले धन अक्षय राहील. भगवान विष्णूने नारदाला असे सांगितले होते की, अक्षय्य तृतीयेला मनुष्य जे काही काम करेल, त्याला तेच फळ मिळेल, जे अक्षय राहील, कधीही संपणार नाही. याचे वर्णन पद्मपुराणात आहे. अक्षय्य तृतीयेला लोक सुख, समृद्धी, वैभव, धन आणि ऐश्वर्य वाढवण्यासाठी अनेक उपाय करतात, परंतु या दिवशी काही अशा गोष्टी आहेत ज्या करू नये, कारण यामुळे देवी लक्ष्मी नाराज होऊ शकते आणि तुम्हाला आर्थिक समस्यांना सामोरं जावं लागू शकतं. अक्षय्य तृतीयेच्या दिवशी कोणकोणत्या गोष्टी करू नयेत, याविषयी काशीचे ज्योतिषाचार्य चक्रपाणी भट्ट यांच्याकडून जाणून घेऊ. अक्षय्य तृतीयेला काय करू नये - 1. अक्षय्य तृतीयेच्या मुहूर्तावर सोने खरेदी करण्याची परंपरा आहे, परंतु या दिवशी प्लास्टिक, अॅल्युमिनियम किंवा स्टीलची भांडी किंवा वस्तू खरेदी करू नये, असे मानले जाते. धार्मिक मान्यतेनुसार या गोष्टींवर राहूचा प्रभाव असतो. यामुळे घरात नकारात्मकता आणि गरिबी येऊ शकते. 2. अक्षय तृतीयेच्या दिवशी कोणालाही पैसे किंवा कर्ज देणे टाळावे. यामागे एक श्रद्धा आहे की, असे केल्याने घरातील लक्ष्मी दुसऱ्याकडे जाते. 3. अक्षय्य तृतीयेच्या दिवशी सोने किंवा सोन्याचे दागिने हरवणे अशुभ आहे. हे धन हानीचे लक्षण मानले जाते. अक्षय्य तृतीयेच्या दिवशी धनहानी शुभ मानली जात नाही. 4. अक्षय्य तृतीयेच्या दिवशी पूजास्थान, तिजोरी किंवा पैशाची जागा अस्वच्छ ठेवू नका. घराची नीट साफसफाई करा. अस्वच्छ घर नकारात्मकतेने भरलेले असते, ज्यामध्ये लक्ष्मीचा वास राहत नाही. 5. अक्षय्य तृतीयेच्या मुहूर्तावर चोरी, खोटे बोलणे, जुगार इत्यादी गैरकृत्यांपासून दूर राहा. यातून कमावलेली पापे आयुष्यभर तुमच्यासोबत राहतील. 6. अक्षय्य तृतीयेच्या दिवशी मांस, मद्य, लसूण, कांदा इत्यादींचे सेवन करू नये. तामसिक गोष्टींपासून दूर रहा.

7. या दिवशी शंख, कवड्या, श्रीयंत्र, कुबेर यंत्र, भगवान गणेश, श्री हरी विष्णू यांचा आपल्या वाणीने- कृतीने अपमान होणार नाही याची काळजी घ्या. हे सर्व गोष्टी देवी लक्ष्मीला अतिशय प्रिय आहेत. 8. अक्षय्य तृतीयेच्या दिवशी पूजा करताना माता लक्ष्मीला तुळशीची पाने अर्पण करू नका. हे वाचा -   सरकारी नोकरीचा योग यायला कुंडलीत ग्रहांची ‘अशी’ बैठक जुळायला लागते (सूचना : येथे दिलेली माहिती धार्मिक श्रद्धेवर आधारित आहे. याला कोणताही शास्त्रीय पुरावा नाही. न्यूज 18 लोकमत त्याची हमी देत नाही.)

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.

फोटो

महत्वाच्या बातम्या