अधिक श्रावणात कोणत्या गोष्टी करतात (प्रतिकात्मक छायाचित्र)
मुंबई, 18 जुलै : आजपासून अधिक श्रावण महिना सुरू होत आहे. यंदा श्रावण 2 महिने असणार आहे, त्यामुळे दोन महिन्यांचे मिळून एकूण 8 श्रावण सोमवार येतील. दरवर्षी श्रावणात जे विधी करतो ते कधी करायचे? असे एक ना अनेक प्रश्न लोकांना पडले आहेत. याविषयी तज्ज्ञ ज्योतिषी ऋतुपर्णा मूजुमदार यांनी दिलेली माहिती पाहुया. खरंतर ह्या सगळ्या प्रश्नाचं उत्तर एकच, ते म्हणजे श्रावण महिना दरवर्षीप्रमाणे एकच महिनाच आहे. दिनदर्शिकेमध्ये अधिक श्रावण आणि निज श्रावण असं लिहलेलं असल्यामुळे श्रावण महिन्याबाबत संभ्रम निर्माण होणं स्वाभाविक आहे. सविस्तर सांगायचं झाल्यांस सौरवर्ष व चांद्रवर्ष यांच्यांत दरवर्षी साडेएकरा दिवसांचा फरक पडतो. कालगणनेच्या सोयीसाठी, यात मेळ घालण्यासाठी दर 32 महिन्यांनंतर एक अधिक महिना घेतला जातो आणि हे अंतर पूर्ववत केले जाते. अधिक महिन्यात रविची संक्रांत होत नाही. ह्या महिन्यास पुढील महिन्याचे नाव असते. अधिक महिन्यालाच पुरुषोत्तम मास, मलमास, धोंड्याचा महिना अशी नावंही आहेत. 17 जुलै 2023 ला मध्यरात्री अमावस्या संपून 18 जुलै 2023 पासून अधिक महिना सुरू होईल तर 16 ऑगस्ट 2023 रोजी दुपारी 03 वाजुन 07 मिनिटांनी अधिक महिना संपेल आणि श्रावण महिना सुरू होईल.
जावयाला, ब्राह्मणाला, गाईला वाण देणे अधिक महिन्यात जावयाला, ब्राह्मणाला, गाईला वाण देणे, अधिक माहात्म्य वाचणे, आईची पूजा करुन आईची ओटी भरणे, मंदिरात देवांना, गंगेला वाण देणे हे सर्व 18 जुलै ते 15 ऑगस्ट ह्या दरम्यान करण्याची परंपरा आहे. तसेच, श्रावणातील व्रत-वैकल्य, सोमवार व इतर उपवास, पारायण वाचन हे सगळं 17 ऑगस्ट ते 12 सप्टेंबर 2023 ह्या दरम्यान करायचे आहे. Pitradosh: घरात पूर्वजांचे फोटो लावण्यासाठी ही दिशा योग्य; नाही होणार पितृदोषाचा त्रास अधिक महिन्यात दशमी, एकादशी, द्वादशी, पौर्णिमा ह्या विशेष तिथींना दान देण्याचं अधिक महत्त्व आहे. दान देतांना अनारसे, बत्तासे, रेवड्या, तसेच सप्तधान्याची दानं दिली जातात. अनारसे, बत्तासे ह्यासारख्या वस्तु 30+3 ह्या प्रमाणांत देतात. दान शक्यतो तांब्याच्या पात्रात द्यावे. तांब्याचे ताम्हण घेऊन त्यावर पळसाच्या पानाची पत्रावळ ठेवावी. त्या पत्रावळीवर थोडेसे गहु ठेवून त्यावर दान द्यायची वस्तु ठेवावी. हळद-कुंकु वाहुन वस्तूवर तुळशी पत्र ठेवावं. त्यावर वस्त्र झाकून त्यावर दीप ठेवून तुपाची वात लावावी. दान देणार्या व्यक्तीचं पूजन करुन यथाशक्ती प्रमाणे दान वस्तूवर दक्षिणा ठेवून ते दान संबंधित व्यक्तिला द्यावे. त्यामध्ये कोणतेही बंधन नाही, सक्ती नाही. आईची ओटी का भरतात? आईने केलेल्या कन्यादानाबद्दलची कृतज्ञता म्हणून अधिक मासात मुली आपल्या आईची साडी, खण-नाराळाने ओटी भरतात. सौभाग्य वस्तू अलंकार, जोडवे इत्यादी भर घालून वाढवून घ्यावेत. अधिक मासात विष्णू स्वरुप देवतांचं विशेषतः कृष्णाचं महत्त्व जास्त असल्याने कृष्णाला महिनाभर तुळस वाहणे, दररोज थोडासा लोण्याचा नैवैद्य दाखवुन तो एका लहान बाळ-गोपाळाला देणे, असे अनेक उपक्रम करता येतात. अशाप्रमाणे थोडक्यात अधिक मास व श्रावण मास ह्यांची माहिती देण्याचा प्रयत्न आहे. श्रावण सुरू होताच राशीनुसार करा या गोष्टी; शंभू-महादेव अडचणींमध्ये दाखवतील मार्ग (सूचना : येथे दिलेली माहिती ज्योतिषीय ज्ञानावर आधारित आहे. याला शास्त्रीय पुरावा नाही. न्यूज 18 लोकमत त्याची हमी देत नाही.)