अधिक मासात कोणत्या गोष्टी करू नयेत
मुंबई, 26 जुलै : हिंदू कॅलेंडरमध्ये 12 महिने असतात, परंतु दर तिसऱ्या वर्षी अधिक महिन्यामुळे वर्षात 13 महिने येतात. सनातन धर्मात अधिक मासाला विशेष महत्त्व दिले गेले आहे. यामध्ये भगवान विष्णूची पूजा केली जाते आणि काही कामं करणे टाळले जाते. वर्ष 2023 मधील अधिक मास सुरू झाला आहे, जो खूप महत्त्वाचा आहे कारण हा योगायोग 19 वर्षांनी घडला आहे. श्रावण महिन्यात भगवान विष्णू आणि भोलेनाथ यांची पूजा करणे अत्यंत लाभदायक मानले जाते. या दरम्यान कोणती कामे करू नयेत आणि कोणती कामे केल्याने फायदा होतो? याविषयी ज्योतिषी आणि वास्तु सल्लागार पंडित हितेंद्रकुमार शर्मा यांच्याकडून जाणून घेऊ. चुकूनही या 8 गोष्टी करू नये - वैदिक ज्योतिषशास्त्रानुसार, मलमासामध्ये काही कामे निषिद्ध मानली जातात, ज्यामुळे भगवान विष्णू क्रोधित होऊ शकतो. अधिक मासात काही निषिद्ध कामे केल्यानं महादेव आणि भगवान विष्णू दोघांचीही कृपा मिळत नाही, असे मानले जाते. या महिन्यात गृहप्रवेश, लग्न, साखरपुडा, घरबांधणी, वधूप्रवेश, देवतांचा अभिषेक, बोअरवेल, विहीर खणने आदी कामे करू नयेत, अधिक मासात ही कामे करणं अशुभ मानलं जातं.
हे करू शकता - ज्योतिषशास्त्रानुसार पुरुषोत्तम महिन्यात उपासना, व्रत, दान, भजन कीर्तन यांचे विशेष महत्त्व सांगण्यात आले आहे. या दरम्यान श्रीमद भगवत गीता, यज्ञ, हवन, भागवत पुराण आणि विष्णु पुराण यांचे पठण किंवा श्रवण करणे अत्यंत लाभदायक मानले जाते. रॉयल लाइफ जगण्याचे शौकीन असतात या राशीची माणसं; स्वप्न सत्यातही उतरवतात विशेष लाभ मिळू शकतात - पुरुषोत्तम महिना भगवान विष्णूला समर्पित आहे. या दरम्यान, त्याच्या मंत्रांचा जप आणि पूजा केल्याने, आपण त्यांचे विशेष आशीर्वाद मिळवू शकता. असे केल्याने भक्तांना नकळत केलेल्या पापांपासून मुक्ती मिळते आणि त्यांच्या सर्व मनोकामना पूर्ण होतात, अशी धार्मिक श्रद्धा आहे. मंत्र- गोवर्धनधरं वन्दे गोपालं गोपरूपिणम्। गोकुलोत्सवमीशानं गोविन्दं गोपिकाप्रियम्।। घरात पितृदोष असेल तर असे संकेत वारंवार दिसतात; सोमवती अमावस्येला करा हे उपाय (सूचना : येथे दिलेली माहिती धार्मिक श्रद्धेवर आधारित आहे. याला शास्त्रीय पुरावा नाही. न्यूज 18 लोकमत त्याची हमी देत नाही.)