JOIN US
मराठी बातम्या / अध्यात्म / डायनिंग टेबल घरात कोणत्या दिशेला असावे? त्याचे हे वास्तु नियम ध्यानात ठेवा

डायनिंग टेबल घरात कोणत्या दिशेला असावे? त्याचे हे वास्तु नियम ध्यानात ठेवा

लोक डायनिंग टेबल विकत घेतात आणि कुठेही ठेवतात, असं करणं वास्तुशास्त्रानुसार चुकीचे आहे. जेवणाचे टेबल देखील वास्तुशास्त्रानुसार महत्त्वाचे मानले जाते. त्याचे नियम जाणून घेऊया.

जाहिरात
संबंधित व्हिडिओ
जाहिरात
News18 लोकमत व्हॉट्सअ‍ॅप चॅनलला फॉलो करा

मुंबई, 09 सप्टेंबर : प्रत्येक व्यक्ती अन्न ग्रहण करतो, अन्न हे केवळ पोट भरण्यासाठीच नसून त्याचा आरोग्यासोबतच मन आणि मेंदूवरही परिणाम होतो. वास्तुशास्त्रानुसार अन्न तेव्हाच तुमच्या आरोग्यासाठी फायदेशीर ठरू शकते जेव्हा ते योग्य दिशेला बसून खाल्ले जाते. वास्तुशास्त्रात दिशेला विशेष महत्त्व आहे. घरातील देव्हारा, स्वयंपाकघर, शयनकक्ष, दिवाणखाना आणि स्नानगृह याबाबत वास्तुशास्त्रामध्ये दिशानिर्देश दिलेले आहेत. यासोबतच घरात ठेवलेल्या छोट्या वस्तूंची दिशा आणि स्थानही वास्तुमध्ये सांगण्यात (Dining Table Vastu Tips) आले आहे. जर तुम्ही घरातील गोष्टी वास्तुनुसार व्यवस्थित ठेवल्या तर तुमच्या सर्व अडचणी दूर होऊ शकतात. डायनिंग टेबल ठेवण्याची दिशाही वास्तुशास्त्रामध्ये सांगितली आहे. डायनिंग टेबल ठेवण्याची योग्य दिशा कोणती? याविषयी दिल्लीचे आचार्य गुरमीत सिंग यांच्याकडून जाणून घेऊया. डायनिंग टेबलसाठी ही योग्य दिशा - लोक डायनिंग टेबल विकत घेतात आणि कुठेही ठेवतात, असं करणं वास्तुशास्त्रानुसार चुकीचे आहे. जेवणाचे टेबल देखील महत्त्वाचे मानले जाते, कारण कुटुंबातील सर्व सदस्य त्यावर एकत्र बसून जेवतात. यामुळे परस्पर प्रेम वाढते. त्यामुळे चुकीच्या दिशेने ठेवलेल्या डायनिंग टेबलचा थेट परिणाम घरातील लोकांवरही होतो. वास्तुशास्त्रानुसार घराची पश्चिम दिशा डायनिंग टेबलसाठी सर्वोत्तम मानली जाते. यासोबतच डायनिंग टेबल आग्नेय दिशेलाही ठेवू शकता. तसेच जेव्हा संपूर्ण कुटुंब एकत्र जेवते तेव्हा लक्षात ठेवा की, जेवताना घराच्या प्रमुखाने नैऋत्य दिशेकडे तोंड करू नये. तसेच डायनिंग टेबल कधीही नैऋत्य दिशेला ठेवू नका. डायनिंग टेबल अन्न आणि संपत्तीशी संबंधित - डायनिंग टेबलला फक्त अन्न खाण्यासाठी योग्य जागा मानू नका, तर त्याचा संबंध घराच्या सुख-समृद्धीशी आहे, त्यामुळे योग्य दिशा देण्यासोबतच जेवणाचे टेबल कधीही अस्वच्छ ठेवू नये हे लक्षात ठेवा. अन्न खाल्ल्यानंतर घाण भांडी ताबडतोब काढून घ्या, स्वच्छ करा. हे वाचा -   नखांच्या आकारावरूनही समजतं स्वभाव आणि बरंच काही, या टिप्स वापरून ओळखा डायनिंग टेबलवर भांडी पडून राहिल्याने घरातील संपत्तीवर परिणाम होतो. जेवणाचे टेबल स्वच्छ ठेवले तर माता अन्नपूर्णा प्रसन्न होते. वास्तुनुसार जेवणाच्या टेबलावर नेहमी पाण्याची भांडी किंवा बाटली ठेवा. यामुळे माता अन्नपूर्णाच्या कृपेने घरात कधीही अन्नाची कमतरता भासत नाही. हे वाचा -  येथे अजूनही रात्री सुरू असते श्रीकृष्णाची रासलीला; पाहणारे वेडे होतात, हरपतं भान (सूचना : येथे दिलेली माहिती धार्मिक श्रद्धेवर आधारित आहे, याला कोणताही शास्त्रीय पुरावा नाही. न्यूज 18 लोकमत त्याची हमी देत नाही.)

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.

फोटो

महत्वाच्या बातम्या