मुंबई, 1 मे : वास्तुशास्त्रानुसार, व्यक्तीने दैनंदिन जीवनात केलेल्या कृतींचे सकारात्मक आणि नकारात्मक परिणाम नक्कीच होतात. म्हणूनच असे म्हटले जाते की वास्तूनुसार काही काम केले पाहिजे, जेणेकरून शारीरिक, मानसिक आणि आर्थिक समस्यांना सामोरे जावे लागणार नाही.
आपल्या आयुष्यात अनेक वेळा अशी संकटे येतात, ज्याची भरपाई दीर्घकाळापर्यंत करावी लागते. त्याचप्रमाणे कर्जात बुडलेली व्यक्ती आयुष्यभर त्याची परतफेड करत राहते. वास्तुशास्त्रानुसार वास्तुशी संबंधित काही चुका व्यक्तीला कर्जाच्या ओझ्याखाली दडपते. म्हणूनच या चुका तातडीने सुधारणे गरजेचे आहे. वास्तुशास्त्रानुसार जाणून घ्या, व्यक्तीने कोणत्या चुका टाळाव्यात.
येथे ठेवू नका डस्टबिन
वास्तुशास्त्रानुसार घरातील प्रत्येक गोष्टीची दिशा ठरवलेली असते. तसेच डस्टबिन अशा प्रकारे कुठेही ठेवू नये. म्हणूनच घराबाहेर किंवा प्रवेशद्वारावर कधीही डस्टबिन ठेवू नका. असे केल्याने माता लक्ष्मी क्रोधित होते. यासोबतच समाजात मान-सन्मान कमी होतो. घराचा मुख्य दरवाजा नेहमी स्वच्छ ठेवा.
दैनंदिन राशी भविष्य: सामाजिक जीवनात प्रसिद्धी असा हा काळ आहे
अंथरुणावर खाऊ नका
वास्तुशास्त्रानुसार, व्यक्तीने अंथरुणावर बसून कधीही जेवू नये. कारण यामुळे माता लक्ष्मी क्रोधित होते आणि सुख-समृद्धीमध्ये खूप अडथळे येतात.
रात्री खरकटी भांडी तशीच सोडू नका
वास्तुशास्त्रानुसार रात्री किचनमध्ये खरकटी भांडी कधीही ठेवू नयेत. काही कारणास्तव तुम्ही त्यांना रात्री धुवू शकत नसाल तर त्यांना स्वयंपाकघरात ठेवू नका. रात्री झोपण्यापूर्वी संपूर्ण स्वयंपाकघर नेहमी स्वच्छ करा. असे केल्याने देवी अन्नपूर्णासोबत लक्ष्मीचाही आशीर्वाद राहतो.
संध्याकाळी या वस्तूंचे दान करू नका
वास्तुशास्त्रानुसार संध्याकाळी दूध, दही, मीठ इत्यादि दान कधीही करू नये. असे केल्याने आर्थिक परिस्थितीवर वाईट परिणाम होतो.
बाथरूममध्ये ठेवू नका रिकामी बादली
बाथरूममध्ये रिकाम्या बादल्या, टब इत्यादी कधीही ठेवू नयेत. बाथरूममध्ये नेहमी किमान एक बादली पाण्याने भरलेली ठेवा. यामुळे नकारात्मक ऊर्जा दूर होते आणि व्यक्ती आर्थिक समस्यांपासून वाचते. सोबतच दुसरी बादली उलटी ठेवावी.
(सूचना : येथे दिलेली माहिती धार्मिक श्रद्धेवर आधारित आहे. याला कोणताही शास्त्रीय पुरावा नाही. न्यूज 18 लोकमत त्याची हमी देत नाही.)