मुंबई, 4 मे: झारखंडच्या धनबादमध्ये अनेक मंदिरे आहेत. निरसाचे पांडवेश्वर मंदिर मोहल्ला आणि चौकात असलेल्या छोट्या मंदिरांसह महाभारत काळाची आठवण करून देते. पण तुम्हाला हे जाणून आश्चर्य वाटेल की, एक असे मंदिर आहे जिथे शंभर वर्षांहून अधिक काळ लोटूनही कधीही पूजा झालेली नाही. गावात प्रवेश करताच मंदिराचा ढाचा दिसतो.
गावकऱ्यांमध्ये प्रचलित आहे ही कथा गावकऱ्यांच्या म्हणण्यानुसार, डुमा गावात बाऊल नावाचा एक संन्यासी राहत होता. त्यांनीच मंदिर बांधले. त्यासाठी जमीनदार आणि दूरवरच्या गावांमध्ये जाऊन भिक्षा मागितली. अनेक महिने भिक्षा मागून मंदिर पूर्ण झाले. यानंतर त्यांनी राधा-माधवची मूर्ती, आरतीचे ताट आणि इतर सर्व पूजेचे साहित्यही गोळा केले होते. Vaishakh Purnima 2023: मानसिक तनावापासून मुक्तीसाठी चंद्राचे उपाय साधूचे वंशज आजही या गावात राहतात डेखोरांनी त्यांची हत्या केली आणि मूर्तीसह सर्व काही लुटून ते निघून गेले. शंभरहून अधिक वर्षांपूर्वी घडलेल्या घटनेपासून मंदिराची तशीच अवस्था आहे. याठिकाणी कधीही मूर्तीची स्थापना झाली नाही किंवा पूजाही केली गेली नाही. दरोडेखोरांनी हत्या केलेल्या हे मंदिर बांधणाऱ्या साधूचे वंशज आजही या गावात आहेत. ते म्हणतात की, ते अनेक पिढ्यांपासून डुमामध्ये राहत आहेत. ज्या अवस्थेत हे मंदिर अनेक दशकांपूर्वी दिसत होते. आजही ते जसेच्या तसे आहे. लक्ष्मीप्राप्तीसाठी करा गुलाबाचे हे सोपे उपाय, घरात नांदेल सुख-समृद्धी साधूचे वंशज म्हणतात की, मंदिर शंभर वर्षांहून अधिक जुने आहे. ते आमच्या पूर्वजांनीच बांधले होते. मात्र त्यांच्या हत्येमुळे या मंदिरात ना मूर्तीची प्रतिष्ठापना होऊ शकली, ना पूजा झाली. मंदिराची डागडुजी करता येईल. पण राधा-माधवच्या मंदिरात रोज पूजा करणे आवश्यक आहे. गावात पुजारी नाही. त्यामुळे मंदिराची जीर्ण अवस्था झाली आहे. (सूचना : येथे दिलेली माहिती धार्मिक श्रद्धेवर आधारित आहे. याला कोणताही शास्त्रीय पुरावा नाही. न्यूज 18 लोकमत त्याची हमी देत नाही.)