मावसभावाकडूनच भाजप नगरसेवक बालाजी कांबळे यांची हत्या
आळंदी नगर परिषदेचे भाजप नगर सेवक बालाजी कांबळे यांची भरदिवसा हत्या करण्यात आल्याची खळबळजनक घटना काल घडली यात कांबळे यांचा मावसभाऊ अजय मेटकरी याच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
Renuka Dhaybar
आळंदी, 26 जून : आळंदी नगर परिषदेचे भाजप नगर सेवक बालाजी कांबळे यांची भरदिवसा हत्या करण्यात आल्याची खळबळजनक घटना काल घडली यात कांबळे यांचा मावसभाऊ अजय मेटकरी याच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.भरदिवसा बालाजी कांबळे यांची दुचाकीवरून भोसरीहून आळंदीला येत असताना त्यांच्यावर धारदार शस्त्रांनी हल्ला करण्यात आला. तो हल्ला कांबळे यांच्या मावसवानेच केला असल्याच्या संशयावरून पोलिसांनी आरोपी अजय मेटकरीला ताब्यात घेतलं आहे.
दरम्यान, बालाजी कांबळे हे आपल्या दुचाकी वरुन भोसरीहून आळंदीला येत होते. त्याच दरम्यान त्यांच्यावर काही अज्ञात हल्लेखोरांनी धारदार शस्त्रांनी हल्ला केला. त्यांच्या डोक्यात आणि शरीरावर अज्ञात हल्लेखोरांनी कोयत्याने वार केले. यामध्ये कांबळे गंभीर जखमी झाले.त्यांना उपचारासाठी तात्काळ पिंपरी येथील वायसीएम रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र उपचारापूर्वीच मृत्यू झाल्याचे डॉक्टरांनी घोषित केले. दुपारी 4 च्या सुमारास ही घटना घडल्यानं आळंदीत खळबळ उडाली आहे. या घटनेनं आळंदीत तणावही निर्माण झाला.