JOIN US
मराठी बातम्या / पुणे / राजकारणात कही 'पे निगाहे, कही पे निशाणा' ठेवावा लागतो - उद्धव ठाकरे

राजकारणात कही 'पे निगाहे, कही पे निशाणा' ठेवावा लागतो - उद्धव ठाकरे

कार्यक्रम हा नेमबाजीचा असल्याने त्याचा संदर्भ देत त्यांनी खुमासदार शैलीत फटकेबाजी केली.

जाहिरात

Nashik: Maharashtra Chief Minister Uddhav Thackeray addresses a passing out parade of probationary police sub-inspectors at the Maharashtra Police Academy (MPA), in Nashik, Monday, Dec. 30, 2019. (PTI Photo) (PTI12_30_2019_000073B)

संबंधित व्हिडिओ
जाहिरात
News18 लोकमत व्हॉट्सअ‍ॅप चॅनलला फॉलो करा

पुणे 18 जानेवारी : 13 व्या अखिल भारतीय नेमबाज स्पर्धेचा आज पुण्यात समारोप झाला. महाराष्ट्रात दुसऱ्यांदा ही स्पर्धा आयोजित करण्यात आली होती. या स्पर्धेत 27 संघ आणि 560 पोलीस नेमबाज स्पर्धेत सहभागी झाले. यावेळी विजेत्या नेमबाजांना पहिल्यांदाच शुद्ध चांदीची पदकं प्रदान केली जाणार आहेत. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हे यावेळी कार्यक्रमाला उपस्थित होते. यावेळी बोलताना त्यांनी चांगलीच फटकेबाजी केली. कार्यक्रम हा नेमबाजी स्पर्धेचा असल्याने त्याचाच संदर्भ देत त्यांनी खुमासदार शैलीत फटकेबाजी केली. ते म्हणाले, होय, मी पण नेमबाज आहे पण राजकारणातला. राजकारणात कहीं पे निगाहे, कही पे निशाणा ठेवावा लागतो. पोलीस दलाचं शारिरीक आणि मानसिक स्वास्थ्य चांगलं ठेवणं हे सरकारचं कर्तव्य आहे. सर्व विजेत्या खेळाडूंचे अभिनंदन करण्यासाठी मी आलोय. या कार्यक्रमाला उपस्थित राहणं हे मी माझं भाग्य समझतो. खेळासाठी जिंकण्याची जिद्द लागते, ती तुमच्या आहे. तुमचा नेम पाहून गुंड घाबरतील असंही ते म्हणाले. आदित्य ठाकरेंचा संजय राऊतांना टोला स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्याबद्दलचा वाद शांत होण्याची चिन्हे दिसत नाहीयेत. सावरकरांना विरोध करणाऱ्यांना थेट अंदमानात पाठवायला पाहिजे असं मत शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी केलं होतं. त्यांचा रोख हा काँग्रेस आणि राहुल गांधी यांच्यावर होता असं मत व्यक्त केलं जातंय. नाराज ‘शिलेदारांना’ जोडण्याचा प्रयत्न, ‘या’ आमदाराने घेतली राज ठाकरेंची भेट महाआघाडीचं सरकार वेग पकडत असतानाच संजय राऊतांनी पुन्हा एकदा असं विधान करण्यामुळे आघाडीत बिघाडी निर्माण होईल अशी भीतीही व्यक्त केली जातेय. राऊतांनी काँग्रेसवर टीका केल्यानंतर निर्माण झालेला तणाव कमी करण्यासाठी पर्यटनमंत्री आदित्य ठाकरेंनी संजय राऊतांना फटकारलं आहे. त्यांनी कोणत्या संदर्भात हे वक्तव्य केलं पहावं लागेल असंही आदित्य यांनी म्हटलं आहे.

काल ‘चूक’ आज ‘अभिमान’, मेगाभरतीच्या वादावर चंद्रकांत पाटलांचा यू टर्न

ते म्हणाले, संजय राऊतांची मतं ही वयक्तिक असतात. त्यांनी याबाबत स्पष्टीकरण दिलंय. काँग्रेस-शिवसेनेची युती कायम आहे. दोन वेगळ्या विचारधारा एकत्र येऊन काम करतात यालाच लोकशाही म्हणतात. भारतरत्नं कोणाला द्यायचं हे भाजपच्या हातात…त्यांनी द्यावं. मात्र, इतिहासावर किती दिवस बोलणार.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.

फोटो

महत्वाच्या बातम्या