काल 'चूक' आज 'अभिमान', मेगाभरतीच्या वादावर चंद्रकांत पाटलांचा यू टर्न

काल 'चूक' आज 'अभिमान', मेगाभरतीच्या वादावर चंद्रकांत पाटलांचा यू टर्न

भाजपामध्ये जे जे कुणी आले त्यांचा मला अभिमान आहे. त्यांचा आम्हाला फायदा झाला आणि होतोय. आमची सत्ता गेल्यानंतर एकही व्यक्ती आम्हाला सोडून गेली नाही.

  • Share this:

मुंबई 18 जानेवारी : भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी मेगाभरती' ही चूक, असं म्हटल्यानंतर भाजपमध्ये खळबळ उडाली होती. भाजपमध्ये आलेल्या नेत्यांची यामुळे चिंता वाढली होती. या पार्श्वभूमी भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी आज खुलासा केला. माझ्या वक्तव्याचा विपर्यास करण्यात आला. पक्षात आलेल्या सगळ्या नेत्यांचा मला अभिमान आहे असं त्यांनी स्पष्ट केलं. काही नेते आल्यामुळे पक्षाची संस्कृती थोडी डायल्यूट झालं असं मी म्हटलं होतं. त्याचा माध्यमांनी विपर्यास केला. भाजपमध्ये आलेल्यांचा पक्षाला फायदा झाला. जे भाजपमध्ये आलेत, लढले, जिंकले किंवा हरले ते सर्व पक्षातच आहेत आणि राहतील असंही त्यांनी सांगितलं.

पाटील म्हणाले, कालच्या माझ्या वक्तव्याचा विपर्यास केला गेला. भाजपामध्ये जे जे कुणी आले त्यांचा मला अभिमान आहे. त्यांचा आम्हाला फायदा झाला आणि होतोय. आमची सत्ता गेल्यानंतर एकही व्यक्ती आम्हाला सोडून गेली नाही.

काय म्हणाले होते चंद्रकांत पाटील?

विधानसभा निवडणुकीच्या काळात भाजपच्या मेगाभरतीमुळे सगळ्याच राजकीय पक्षांना हादरे बसले होते. काँग्रेस आणि राष्ट्रवादीमधून अनेक दिग्गज नेते हे भाजपमध्ये आल्याने भाजपची ताकद वाढली असंही म्हटलं गेलं. शक्तीसंचय करण्यासाठी असे नेते पक्षात घ्यावे लागतात असा दावा देवेंद्र फडणवीस यांनी केला होता.

आदित्य ठाकरेंनी संजय राऊतांना फटकारलं, म्हणाले...

फडणवीसांचे संकटमोचक गिरीश महाजन या सगळ्या मेगाभरतीचे सूत्रधार होते. पण निकालानंतर जे चित्र पुढे आलं त्यामुळे ही मेगाभरती भाजपला फायद्याची ठरली नाही हे सिद्ध झालंय. याची कबुली प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी आज दिली. त्यांच्या या विधानामुळे भाजपमध्येही त्याबाबतीत असंतोष आहे हे स्पष्ट झालंय.

शुक्रवारी पिंपरी-चिंचवड इथं झालेल्या भाजपच्या मेळाव्यात बोलताना चंद्रकांत पाटील म्हणाले, मेगाभरतीमुळे भाजपची संस्कृती थोडी बिघडली. भाजपची संस्कृती अशी नव्हती. हा पक्ष प्रेमावर चालतो. पण थोडा बदल झाला. जो काम करतो त्याला नाही तर तो आपल्या जवळ आहे त्याला पदं दिली गेलीत. हे कल्चर आता उद्धवस्त करावं लागणार आहे.

शिर्डी विरुद्ध पाथरी, साईबाबांच्या जन्मस्थळावरून का होतोय वाद?

ते पुढे म्हणाले, सरकार गेल्या पासून मी गमतीने म्हणतो. मला एक स्वप्न पडले. पडलं नव्हतं पण मी तसं म्हणतो. त्या स्वप्नात परमेश्वर आले आणि ते म्हणाले योजना म्हणून मी हे सरकार काही महिन्यांसाठी घालवले. या महिन्यांत माणसं जरा चेक करू घ्या. तेवढ्यात मला जाग आली, नाहीतर मी विचारणार होतो. किती महिने वाट बघू. ते अस्पष्ट राहिलं. त्यासाठी पुन्हा स्वप्न पडावे लागेल. पण हा असा कालावधी मिळालाय ज्यात कोण आपला आहे, कोण सत्तेसाठी आला होता. हे तपासायचे आहे. हेच या संघटनेचे बेसिक तत्वज्ञान आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Jan 18, 2020 03:46 PM IST

ताज्या बातम्या