JOIN US
मराठी बातम्या / पुणे / देशात टॉप 5 खासदारांच्या यादीत सुप्रिया सुळे पहिल्या, अमोल कोल्हेंचीही धडाकेबाज एंट्री

देशात टॉप 5 खासदारांच्या यादीत सुप्रिया सुळे पहिल्या, अमोल कोल्हेंचीही धडाकेबाज एंट्री

लोकसभेत सर्वात जास्त प्रश्न विचारणार देशातील टॉप फाईव्ह खासदारांची यादी समोर आला आहे. या यादीत पहिले तीन खासदार हे महाराष्ट्रातील आहेत.

जाहिरात
संबंधित व्हिडिओ
जाहिरात
News18 लोकमत व्हॉट्सअ‍ॅप चॅनलला फॉलो करा

पुणे, 22 जून : लोकसभेत सर्वात जास्त प्रश्न विचारणार देशातील टॉप फाईव्ह खासदारांची यादी समोर आला आहे. या यादीत पहिले तीन खासदार हे महाराष्ट्रातील आहेत. बारामती लोकसभा मतदारसंघातील खासदार सुप्रिया सुळे यांनी सर्वाधिक प्रश्न विचारले आहे. त्यामुळे सुप्रिया सुळे या सर्वात जास्त प्रश्न विचारणाऱ्या खासदाराच्या यादीत पहिल्या क्रमांकावर आहे. सुप्रिया सुळे यांच्यापाठोपाठ सुभाष भामरे (धुळे), डॉ. अमोल कोल्हे (शिरूर), सुधीर गुप्ता (मध्य प्रदेश) आणि बिद्युत महतो (जमशेदपूर) यांचा समावेश आहे. सर्वाधिक प्रश्न विचारणाऱ्या महाराष्ट्रातील खासदारांत सुळे, भामरे आणि डॉ. कोल्हे यांचा समावेश आहेच. तसंच शिवसेनेचे मुंबई उत्तर पूर्वमधील खासदार गजानन किर्तीकर यांनी 195 प्रश्न उपस्थित करून चौथा क्रमांक मिळविला आहे. तर पुणे जिल्ह्यातील मावळ लोकसभा मतदारसंघातील  शिवसेनेचे खासदार श्रीरंग बारणे यांनी 194 प्रश्न विचारून पाचवा क्रमांक मिळविला आहे. लॉकडाउनच्या काळात ‘हे’ रुग्ण झाले कमी, नवी माहिती समोर सर्वाधिक प्रश्न  विचारणाऱ्या देशातील पहिल्या पाच खासदारांमध्ये राष्ट्रवादी कॉंग्रेसचे दोन तर भाजपचे तीन खासदार आहेत. महाराष्ट्रातील टॉप फाईव्हमध्ये राष्ट्रवादी कॉंग्रेसचे दोन, भाजपचा एक आणि शिवसेनेच्या दोन खासदारांचा समावेश आहे. मोदी सरकारच्या या मोठ्या निर्णयाविरोधात आदित्य ठाकरेंनी थोपटले दंड विधेयकांच्या बाबतीत भाजपच्या गोपाळ शेट्टी यांनी देशात पहिला क्रमांक पटकावला आहे. तर अमोल कोल्हे आणि श्रीकांत शिंदे यांची नवखे असून कामगिरी चमकदार आहे.अमोल कोल्हे यांनी पहिल्यांदाच लोकसभेची निवडणूक लढवली होती. त्यांनी शिवाजीराव आढळराव पाटील यांचा विजयरथ रोखला आणि शानदार विजय मिळवला. संपादन - सचिन साळवे

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.

फोटो

महत्वाच्या बातम्या