JOIN US
मराठी बातम्या / पुणे / पुण्यातील धक्कादायक प्रकार! BMW वर लघुशंका करण्यापासून रोखलं म्हणून गार्डला पेट्रोल टाकून पेटवलं

पुण्यातील धक्कादायक प्रकार! BMW वर लघुशंका करण्यापासून रोखलं म्हणून गार्डला पेट्रोल टाकून पेटवलं

भर दिवसा त्या सुरक्षा रक्षकावर पेट्रोल टाकून त्याला जिवंत जाळण्याचा प्रयत्न करण्यात आला

जाहिरात
संबंधित व्हिडिओ
जाहिरात
News18 लोकमत व्हॉट्सअ‍ॅप चॅनलला फॉलो करा

पुणे, 20 नोव्हेंबर : पुण्यातील (Pune) एका कंपनीच्या सुरक्षा रक्षकाने एका रिक्षाचालकाला आपल्या मालकाच्या महागड्या गाडीवर लघुशंका करण्यापासून रोखलं तर रागाच्या भरात कथित स्वरुपात पेट्रोल टाकून आग लावली. ही घटना भोसरी औद्योगिक क्षेत्रात मंगळवारी घडली. यामध्ये 41 वर्षीय सुरक्षारक्षक शंकर आगीत होरपळले आहेत. एका पोलीस अधिकाऱ्यांनी सांगितलं की, 31 वर्षीय रिक्षाचालक महेंद्र बाळू कदम याला अटक करण्यात आली आहे. आणि त्याच्याविरोधात भारतीय दंड संहिताअंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. भोसरी एमआयडीसी (Bhosari MIDC) पोलीस ठाण्यातील एका अधिकाऱ्यांनी सांगितलं की, मंगळवारी दुपारी शंकर हे कंपनीच्या मुख्य दरवाज्यावर ड्यूटीवर तैनात होते. त्यावेळी तेथून जाणाऱ्या कदम यांनी तेथील एसयूव्ही कारवर लघुशंका करण्यास सुरुवात केली. ही कार कंपनीच्या मालकाची होती. त्यांनी सांगितलं की, गार्डने जेव्हा कदम यांना रोखलं तेव्हा त्याला राग आला. त्यावेळी तो तेथून निघून गेला. हे ही वाचा- मोठी बातमी! ऐन दिवाळीत सापडला मोठा शस्त्रसाठा, पुण्यात लादेन टोळीला अटक मात्र त्यानंतर सायंकाळी 4 वाजून 30 मिनिटांनी एका बाटलीत पेट्रोल घेऊन रिक्षाचालक कंपनीसमोर येऊन उभा राहिला. आणि त्याने बाटलीतील पेट्रोल शंकर यांच्या अंगावर टाकली आणि आग लावली. यामध्ये सुरक्षारक्षक होरपळला. त्यानंतर तातडीने शंकर यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले. सध्या त्यांच्यावर रुग्णालयात उपचार सुरू आहे. तर या प्रकरणात 31 वर्षीय रिक्षाचालक महेंद्र बाळू कदम याला अटक करण्यात आली आहे.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.

फोटो

महत्वाच्या बातम्या