JOIN US
मराठी बातम्या / पुणे / अयोध्येतील राम मंदिराच्या भूमिपूजनासाठी पुण्यातून जाणार पवित्र गोष्ट

अयोध्येतील राम मंदिराच्या भूमिपूजनासाठी पुण्यातून जाणार पवित्र गोष्ट

हिंदू जागरण मंचच्यावतीने या मृद्रा पाठवण्यात येणार असल्याची माहिती देण्यात आली आहे.

जाहिरात
संबंधित व्हिडिओ
जाहिरात
News18 लोकमत व्हॉट्सअ‍ॅप चॅनलला फॉलो करा

पुणे, 02 ऑगस्ट : येत्या तीन दिवसांत अयोध्येत राम मंदिराचे भूमिपूजन होणार आहे. यासाठी अयोध्येत जय्यत तयारी करण्यात आली आहे. या खास सोहळ्यासाठी पुण्यातूनही एक खास गोष्ट जाणार आहे. पुण्यातून श्रीक्षेत्र वढू इथल्या पवित्र मृदा (माती) पाठवण्यात येणार आहे. हिंदू जागरण मंचच्यावतीने या मृद्रा पाठवण्यात येणार असल्याची माहिती देण्यात आली आहे. समस्त हिंदू धर्माचे श्रद्धास्थान असलेल्या अयोध्येतील श्रीराम मंदिराच्या निर्माणात पुणे जिल्ह्यातील धर्मवीर छत्रपती श्री संभाजी महाराज यांचे बलिदान स्थळ असलेल्या आणि त्यांच्या स्मृती जपणाऱ्या श्रीक्षेत्र वढू इथल्या पवित्र मृदा (माती) पाठवण्यात येणार आहे. हिंदू जागरण मंचाच्या वतीने श्रीराम जन्मभूमी तीर्थक्षेत्र ट्रस्टचे कोषाध्यक्ष गोविंदगिरी महाराज यांच्याकडे ही मृदा असलेला चांदीचा कलश नुकताच सुपूर्द करण्यात आला. येत्या 5 तारखेला आयोद्धेत पाठवण्यात येणार आहे. HSC मार्कशीट आणि शाळा सोडल्याचा दाखला देण्यासाठी मुंबईमध्ये शाळा उघडल्या… हिंदू जागरण मंचाचे अध्यक्ष सुहास पवार, पुणे शहर प्रमुख निलेश भिसे, सहप्रमुख राजेंद्र गावडे, सुहास साळवी, अक्षय उत्तेकर, महिला प्रमुख नलिनीताई गावडे, सुहास परळीकर, प्रसन्न दशरथ आदी कार्यकर्ते यावेळी उपस्थित होते. धक्कादायक! 3 युवकांनी कापला अपंग मुलाचा प्रायव्हेट पार्ट, प्रकृती नाजूक पुण्यातील मॉडेल कॉलनीतील स्वामी गोविंदगिरी महाराजांच्या निवासस्थानी हा सोहळा झाला. अयोध्येत उभारण्यात येत असलेल्या भव्य राममंदिराचा भूमिपूजन सोहळा पुढील आठवड्यात होत आहे. त्या सोहळ्याला गोविंदगिरी महाराज ही मृदा घेऊन जाणार आहेत.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.

फोटो

महत्वाच्या बातम्या