JOIN US
मराठी बातम्या / पुणे / कोयता गँगला फोडून काढणाऱ्या पोलीस दादांना मिळालं खास गिफ्ट, सोशल मीडियावरही जलवा

कोयता गँगला फोडून काढणाऱ्या पोलीस दादांना मिळालं खास गिफ्ट, सोशल मीडियावरही जलवा

लोकांची धावपळ, आरडाओरड, हल्लेखोरांकडून कोयत्याचा नंगा नाच सुरू असताना पोलीस नाईक धनंजय पाटील आणि अक्षय इंगवले यांनी या हल्लेखोरांचा पाठलाग करून त्यांच्या मुसक्या आवळल्या होत्या.

जाहिरात
संबंधित व्हिडिओ
जाहिरात
News18 लोकमत व्हॉट्सअ‍ॅप चॅनलला फॉलो करा

पुणे, 9 जानेवारी : पुण्यात मद्यधुंद अवस्थेत कोयत्याने नागकिरिकांमध्ये दहशत पसरवित दुकानांची तोडफोड करणार्‍या गँगची नशा उतरविणार्‍या दोघा जिगरबाज पोलीस कर्मचार्‍यांना पोलीस आयुक्त रितेश कुमार यांनी शाबासकी देत 50 हजारांचे रिवार्ड जाहीर केले आहेत. तर, दुसरीकडे हा व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर सिंहगड ठाण्याच्या या दोन्ही बीट मार्शलांचा सोशल मीडियावरही डंका वाजत आहे. फेसबुक आणि इन्स्टाग्रामवर त्यांना एकाच दिवसात तब्बल 60  हजारांवर नेटकर्‍यांनी फॉलो केलं आहे. फॉलोवरच्या संख्येत वाढ   पोलीस नाईक धनंजय पाटील  आणि पोलीस अमलदार अक्षय इंगवले अशी या जिगरबाज पोलीस कर्मचाऱ्यांची नावं आहेत. या कर्मचाऱ्यांनी मोठ्या हिमतीनं कोयता गॅँगचा सामना केला. त्यांनी कोयता गँगमधील गुंडांचा सामना कसा केला याचा व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर ते सोशल मीडियावर स्टार झाले आहेत. एकाच दिवसामध्ये त्यांना तब्बल  60 हजारांहून अधिक जणांनी फॉलो केलं आहे. हेही वाचा :    काका उठला पुतण्याच्या जीवावर, ऊसाच्या शेतात दिसला तेव्हा… पुण्यातील धक्कादायक घटना त्या दिवशी नेमकं काय घडलं?         सिंहगड पोलीस ठाण्याचे बीट मार्शल धनंजय पाटील आणि अक्षय इंगवले घटनेच्या दिवशी रात्रपाळीवर होते. परिसरात दुचाकीवरून गस्त घालत असताना अचानकपणे सिंहगड कॅम्पस परिसरात नागरिकांची धावपळ सुरू झाल्याचं त्यांच्या लक्षात आलं. त्यानंतर त्यांना दोघांच्या हातात कोयता दिसला. हे दोघेही दुकानांची तोडफोड करत दुचाकीस्वारांना अडवून मारहाणीचा प्रयत्न करत होते. यामुळे नागरिकांमध्ये दहशत निर्माण झाली होती. पोलिसांचं कौतुक     लोकांची धावपळ, आरडाओरड, हल्लेखोरांकडून कोयत्याचा नंगा नाच सुरू असतानाच दुचाकीस्वार पोलीस नाईक धनंजय पाटील यांच्यामागे बसलेल्या अक्षय इंगवले यांनी गाडीवरून उडी मारत या हल्लेखोरांचा पाठलाग करत त्यांना पकडे. त्यानंतर पोलिसांनी त्यांच्या हातातील कोयते ताब्यात घेऊन त्यांना चांगलाच चोप दिला. या कामगिरीसाठी संबंधित पोलीस कर्मचाऱ्याचं सर्व स्थरातून कौतुक होत आहे.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.

फोटो

महत्वाच्या बातम्या