JOIN US
मराठी बातम्या / पुणे / पुण्यातल्या शाळांचा मोठा निर्णय; पालकांवर आरोप करत वर्गच ठेवले बंद

पुण्यातल्या शाळांचा मोठा निर्णय; पालकांवर आरोप करत वर्गच ठेवले बंद

पुणे आणि पिंपरी चिंचवड परिसरातल्या एका संघटनेशी जोडलेल्या 1400 शाळांनी (Pune Schools) तीन दिवस बंद पुकारला आहे. या दिवसांत ऑनलाइन वर्ग घेतले जाणार नाहीत.

जाहिरात
संबंधित व्हिडिओ
जाहिरात
News18 लोकमत व्हॉट्सअ‍ॅप चॅनलला फॉलो करा

पुणे, 15 डिसेंबर : कोरोनाच्या (coronavirus) काळात ऑनलाईन क्लासेसचं (online classes) रुटीन आता शाळांसह पालक आणि विद्यार्थ्यांच्याही अंगवळणी पडलं आहे. मात्र याच काळात नोकरी-व्यवसायावर परिणाम झाल्याने अनेक पालकांसह शाळांचीही आर्थिक बाजू डळमळीत झाल्याचे दिसत आहे. पुणे आणि पिंपरी चिंचवड परिसरातल्या काही शाळांनी (Pune schools) यावर एक मोठा निर्णय घेत तीन दिवस जणू बंदच पुकारला आहे. एका संघटनेशी जोडलेल्या पुण्यातील शाळांनी हा निर्णय घेतला आहे. पालकांनी वेळेवर शाळेची फी भरली नसल्याचं कारण देत मंगळवारपासून सलग तीन दिवस ऑनलाईन वर्ग बंद ठेवण्याची घोषणा सोमवारी केली. पिंपरी-चिंचवडमधल्याही काही शाळा यात सहभागी आहेत. ‘फेडरेशन ऑफ स्कूल्स असोसिएशन इन महाराष्ट्र’ (FSAM)च्या पदाधिकाऱ्यांनी ‘गंभीर आर्थिक अडचणी’चं कारण देत हा निर्णय घेतल्याचं कळवलं आहे. ‘एफएसएएम’चे अध्यक्ष राजेंद्र सिंग म्हणाले, ‘पुणे आणि पिंपरी चिंचवड भागातल्या इंग्रजी माध्यमाच्या साधारण 1400 शाळा संघटनेच्या सदस्य आहेत. वार्षिक स्नेहसंमेलन, खेळ, पाल्यांची बससेवा, जेवण या कोविडच्या काळात बंद असलेल्या सुविधांचे पैसे आम्ही पाल्यांकडून घेतले नाहीत. शिवाय शाळेची फी भरायला पालकांना मासिक, तिमाही अशा हफ्त्यांचीही सुविधा शाळांनी देऊ केली. संघटनेनं फीमध्ये सवलतही दिली. मात्र हे इतकं करूनही 50 टक्के पालकांनी फी भरलेली नाही. हा सवलतीचा गैरफायदा झाला.’ पुढे ते म्हणाले, ‘गेले 7 महिने आम्ही खूप संयम बाळगत ऑनलाईन माध्यमातून दर्जेदार शिक्षण दिलं. पण आता आमच्या सदस्य असलेल्या शाळा आर्थिक अडचणीत सापडल्यात. अशा पद्धतीनं पुढं कामकाज सुरू ठेवणं शक्य नाहीय म्हणून नाईलाजानं हा निर्णय घेत आहोत.’

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.

फोटो

महत्वाच्या बातम्या