पुणे, 26 जुलै: पुण्यात जहांगीर हॉस्पिटलमधील सर्व कर्मचाऱ्यांनी प्रशासनाविरोधात आंदोलन सुरू केलं आहे. हॉस्पिटल प्रशासनावर कर्मचाऱ्यांनी गंभीर आरोप केले आहेत. कामाचा अतिरिक्त ताण आणि व्यवस्थापनाच्या मनमानीविरोधात गेल्या काही महिन्यांपासून कर्मचाऱ्यांमध्ये असंतोष आहे. त्यात एचआरने रात्री 12 वाजता हॉस्टेलवर येऊन नर्सना धमकावल्याने कर्मचाऱ्यांनी एल्गार पुकारला आहे. हेही वाचा… सोशल मीडिया स्टार आजीची थेट गृहमंत्र्यांनी घेतली भेट, साडी-चोळीसह दिले सव्वा लाख एचआर अधिकाऱ्यानं हॉस्टेलवर येऊन नोकरीवरून काढून टाकण्याची धमकी काही नर्सला दिली. त्यामुळे कर्माचारी शनिवारी रस्त्यावर उतरले आहेत. पुण्याच्या जहांगीर हॉस्पिटलचा स्टाफ रस्त्यावर उतरला आहे. या आंदोलनात जवळपास 150 च्यावर कर्मचारी सहभागी झाले आहेत. कमी स्टाफमध्ये जास्त जास्त ड्युटी करून घेतली जात असल्याचा आरोप कर्मचाऱ्यांनी केला आहे. जहांगीर हॉस्पिटलमध्ये सध्या 70 च्यावर कोरोनाबाधित रुग्ण आहेत. त्यामुळे कोरोनाच्या पार्श्वभूमीवर कर्मचाऱ्यांमध्ये भीतीचं वातावरण आहे. नर्स, वॉर्डबॉय यांनी आंदोलन सुरू केल्यानं जहांगिर हॉस्पिटलच्या दैनंदीन कामावर परिणाम झाला आहे. इमर्जन्सी वार्ड मात्र सुरू आहे. हॉस्पिटल व्यवस्थापनाची आंदोलकांसोबत चर्चा सुरू असल्याची माहिती मिळत आहे. पुण्यात होऊ शकतो विकेंड लॉकडाऊन… दरम्यान, राज्यात कोरोनाचा धोका दिवसेंदिवस वाढतच चालला आहे. अशा मुंबई, पुण्यासारख्या शहरांमध्ये कोरोनाच्या रुग्णांची संख्या दिवसेंदिवस वाढत चालली आहे. पुण्यात यापुढे सरसकट लॉकडाऊन होणार नसलं तरी वीकेंड लॉकडाऊनच्या प्रस्तावार गांभिर्याने विचार सुरू असून त्यासोबतच प्रशासन काही अभिनव उपक्रमही राबवले जाणार असल्याची महत्त्वाची माहिती जिल्हाधिकारीन नवल किशोर राम यांनी दिली आहे. त्यामुळे पुण्यात विकेंड लॉकडाऊन होण्याची शक्यता नाकारता येणार नाही. पुण्याचे जिल्हाधिकारी नवल किशोर राम यांनी ‘न्यूज 18 लोकमत’शी बोलताना ही माहिती दिली आहे. तसंच पुण्यातील 10 दिवसांच्या लॉकडाऊनचे येत्या काही दिवसात नक्कीच सकारात्मक परिणाम दिसतील, असंही त्यांनी म्हटलं आहे. बिबवेवाडी भागात नव्याने सुरू करण्यात आलेल्या कामगार कोविड हॉस्पीटलची आज त्यांनी पाहणी केली. यावेळी ते माध्यमांशी बोलत होते. पुण्यात कोरोनानं थैमान घातलं आहे. पुण्यात 13 ते 23 जुलै 10 दिवसांचा कडक लॉकडाऊन घेण्यात आला तरी देखील कोरोना आटोक्यात आला नाही. धक्कादायक म्हणजे कोरोना साथीशी लढणारा आरोग्य विभागच बाधित झाला आहे. तीन सहायक आरोग्य अधिकारी पॉजिटिव्ह आढळले आहेत. हेही वाचा… अंधश्रद्धेतून मायलेकाचा बळी, कल्याणमधील धक्कादायक प्रकाराने सर्वत्र खळबळ पुणे महापालिकेत आतापर्यंत 313 कर्मचारी कोरोना पॉजिटिव्ह आढळले आहेत. त्यात आरोग्य विभागातील कर्मचारी आणि अधिकाऱ्यांचाही समावेश आहे. दरम्यान, महापौरांसह 168 कर्मचारी कोरोनामुक्त झाले आहेत तर 132 कर्मचारी सध्या उपचार घेत आहेत. तर आतापर्यंत कोरोनामुळे 13 जणांची मृत्यू झाला आहे.