पुणे, 25 जुलै: पुण्यातील सोशल मीडिया स्टार आजीबाई शांताबाई पवार यांची शनिवारी राज्याचे गृहमंत्री अनिल देशमुख यांनी त्यांच्या घरी जाऊन भेट घेतली. यावेळी आजीबाईंनी गृहमंत्र्यांसमोर पुन्हा आपली डोंबारी कला सादर केली. गृहमंत्री देशमुख यांनी यावेळी त्यांना सव्वा लाखांची आर्थिक मदत आणि साडी चोळी सप्रेम भेट दिली. या अनोख्या भेटीनं आजीबाई हरकून गेल्या होत्या. हेही वाचा… 5 वर्षांच्या मुलासाठी सोनियाने स्कुटीवरून केला मुंबई-जमशेदपूर 1800 किमी प्रवास दरम्यान, शांताबाई पवार यांचा व्हायरल व्हिडिओ गृहमंत्री अनिल देशमुख यांच्या पर्यंतही पोहोचला. याबाबत गृहमंत्री म्हणाले, “त्यांचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आणि मला त्यांच्याशी भेटण्याची तीव्र इच्छा होती, म्हणून आज मी त्यांना भेटायला त्यांच्या घरी आलो आहे.” दरम्यान, आजीला स्टार बनवणारी अर्थात आजीचा व्हिडिओ शूट करून सोशल मीडियावर टाकणाऱ्या ऐश्वर्या काळेही आज शांताबाई पवार यांना भेटायला आल्या होत्या. यावेळी शांताबाईंनी आपल्याला गेल्या दोन दिवसांत भरपूर मदत मिळाल्याचं सांगितले. पण आपल्याला पक्कं घर बांधून हवंय, अशीही मागणी शांताबाई यांनी यावेळी बोलून दाखवली.
Can I get her details please. Wanna open a small training school with her where she can train women of our country some self defence techniques . https://t.co/Z8IJp1XaEV
— sonu sood (@SonuSood) July 24, 2020
अभिनेता सोनू सुद मदतीसाठी आला धावून… कोरोना या संकटाच्या काळात उदरनिर्वाहासाठी रस्त्यांवर लाठ्या-काठ्यांचा खेळ सादर करणाऱ्या 85 वर्षीय आजीबाईंचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर सध्या तुफान व्हायरल झाला. एकेकाळी त्या चित्रपटांमध्येही झळकल्या होत्या. सीता-गीता आणि शेरनी या चित्रपटांमध्ये त्यांनी काम केले होते. मात्र, हलाखीच्या परिस्थितीमुळे त्यांना आता पुण्यातील रस्त्यावर लाठ्या-काठ्यांचा खेळ सादर करावा लागतो. पुण्यातील हडपसर या भागात राहणाऱ्या शांताबाई यांच्या मदतीसाठी आता अभिनेता सोनू सुदने पुढाकार घेतला आहे. आजीचा व्हिडिओ पाहून सोनूने त्यांच्यासाठी मदतीचा हात पुढे केला. हेही वाचा… मोठा निर्णय! इयत्ता 1 ली ते 12 वीचा अभ्यासक्रम 25 % कमी होणार, सरकारची मंजुरी शांताबाईंच्या संपर्काचा तपशील विचारत सोनूने ट्वीट केल, ‘मला या आजीबाईंची माहिती मिळू शकेल का? त्यांच्यासोबत एक छोटी प्रशिक्षण शाळा उघडायची आहे. जिथे त्या आपल्या देशातील महिलांना स्वयंरक्षणासाठी काही गोष्टी शिकवू शकतीलट, असं सोनू म्हणाला आहे.