JOIN US
मराठी बातम्या / पुणे / पुण्यात लॉकडाऊनची टांगती तलवार; व्यापाऱ्यांवर भीतीचं सावट

पुण्यात लॉकडाऊनची टांगती तलवार; व्यापाऱ्यांवर भीतीचं सावट

पुण्यात वाढता कोरोना संसर्ग आणि लॉकडाऊनची टांगती तलवार याचा परिणाम म्हणून गर्दीची ठिकाणे ओस पडू लागली आहेत.

जाहिरात
संबंधित व्हिडिओ
जाहिरात
News18 लोकमत व्हॉट्सअ‍ॅप चॅनलला फॉलो करा

पुणे, 25 मार्च : पुण्यात वाढता कोरोना संसर्ग आणि लॉकडाऊनची टांगती तलवार याचा परिणाम म्हणून गर्दीची ठिकाणे ओस पडू लागली आहेत. शहराच्या मध्यवर्ती भागात असलेली महात्मा फुले मंडई एवढी गजबजलेली असते की, पाय ठेवायला जागा नसते. मात्र मंडईत शुकशुकाट आहे. भाजीपाला हा नाशवंत माल आहे. गिऱ्हाईक नसेल तर विकायचं काय आणि खायचं काय हा विक्रेत्यांसमोर प्रश्न आहे. मंडईत ताजी पालेभाजी, फळभाजी, फळ फळावळ यांची मुबलक आवक आहे. पण खरेदीदारच नाहीत. कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव आणि लॉकडाऊनचे सावट यामुळं पुणेकर फिरकत नाही. (Possibility of lockdown in Pune Fear expressed by traders) खरं तर सगळं सुरळित होईल असं वाटत होतं. मात्र नव्या कोरोनामुळे 90 टक्के परिणाम झाला आहे, असं विक्रेते संघटना प्रमुख राजाभाऊ म्हणाले. काही झालं तरी परत लॉकडाऊन नको. नाहीतर उपासमार होईल. विक्रेते मास्क घालत आहेत. शारीरिक अंतर नियम ही पाळत आहेत. लॉकडाऊन लावला तर शेतकरी ही अडचणीत येतील. याकडे विक्रेत्यांनी लक्ष वेधले. मंडईतच होळी धुळवड, रंग पंचमीनिमित्त टिमकी, गवऱ्या, रंगांची दुकाने गजबजू लागली आहेत. मात्र कोरोनामुळे होळी, धुळवड, रंगपंचमी यावर बंदी, निर्बंध आल्याने विक्रेत्यांचं तोंडचं पाणी पळालं आहे. हे ही वाचा- कोरोनातून वाचली मात्र लेकानेच सोडला हात, पुण्यातील आजीची वेदनादायी कहाणी सगळी खरेदी झाली आणि आता बंदी आली मग आता खरेदी केलेल्या मालाचे काय करणार? असा सवाल लक्ष्मीबाई यांनी केला. लहान मूल तरी येतील आणि टिमकी, रंग नेतील अशी त्यांना आशा आहे. मुंबईप्रमाणे पुण्याची जीवन वाहिनी म्हणजे pmp बस. सार्वजनिक वाहतूक व्यवस्था आणि आधीच डबघाईला आलेली आर्थिक दृष्ट्या मोडकळीस आलेल्या pmp मध्ये ही प्रवासी नाहीत. काही ठिकाणी तर माणसांची संख्या तुरळक आहेत. 50 टक्के प्रवाशांना परवानगी असल्यामुळे प्रवासी नाराज होत आहेत. मास्क अनिवार्य आहे, एका सीट वर एकच प्रवासी बसला पाहिजे यातून चालक वाहक यांच्याशी वाद होतात. हुज्जत घालतात त्यात काही चालक वाहक positive आले आहेत. नोकरीला गेलं नाही तरी चालत नाही. लॉकडाऊन झाला pmp बंद झाली तर वेतन रखडणार ही भीतीदेखील लोकांच्या मनात आहे

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.

फोटो

महत्वाच्या बातम्या