मराठी बातम्या /बातम्या /कोरोना वायरस /

कोरोनातून वाचली मात्र लेकानेच सोडला हात, पुण्यातील आजीची वेदनादायी कहाणी

कोरोनातून वाचली मात्र लेकानेच सोडला हात, पुण्यातील आजीची वेदनादायी कहाणी

पुण्यातील ही आजी कोरोनाच्या संकटातील वाचली मात्र लेकानेही दिलेल्या या वेदनेमुळे ती हुंदके देऊन रडते आहेत

पुण्यातील ही आजी कोरोनाच्या संकटातील वाचली मात्र लेकानेही दिलेल्या या वेदनेमुळे ती हुंदके देऊन रडते आहेत

पुण्यातील ही आजी कोरोनाच्या संकटातील वाचली मात्र लेकानेही दिलेल्या या वेदनेमुळे ती हुंदके देऊन रडते आहेत

पुणे, 24 मार्च : कोरोनातून बऱ्या झालेल्या वृद्ध आईला तिच्या मुलाने घरात घेण्यास नकार दिल्याचा धक्कादायक प्रकार पुण्यात घडला आहे. गेले 11 दिवस ती वृद्ध महिला पालिकेच्या लायगुडे हॉस्पिटलमध्ये उपचार घेत होती. या हॉस्पिटलच्या डॉक्टरांनी मोठे शर्थीचे प्रयत्न करून या महिलेला कोरोनाच्या आजारातून बरं केलं आणि तिला डिस्चार्ज दिला आणि त्यानंतर लायगुडे हॉस्पिटलमधील डॉक्टरांनी तिच्या रिक्षाचालक मुलाला फोन करुन आई बरी झाल्याचं कळवलं.

मात्र त्यानंतर आलेला अनुभव खूपच धक्कादायक होता. तिच्या रिक्षाचालक मुलाने तिला घरात घेण्यास चक्क नकार दिला. जेव्हा पोलीस तिला तिच्या घरी घेऊन गेले तेव्हा देखील मुलगा आणि त्याचं कुटुंबं घराला कुलूप लावून बाहेर निघून गेलेल दिसून आलं. तासभर थांबूनही घर उघडायला कोणीच येत नाही हे बघून पोलिसांना या आजींना पुन्हा हॉस्पिटलला आणून सोडावं लागलं. ही बातमी माध्यमांपर्यंतच पोहोचताच आज अखेर पोलिसांनी तिचा मुलगा आणि सुनेला हॉस्पिटलमध्ये आणून त्याला समजावून सांगितलं तसंच लायगुडे हॉस्पिटलचे अधिकारी कल्पेश घोलप आणि डॉक्टर शुभांगी शहा या दोघांनीही आई, मुलगा आणि सुनेला एकत्र बसवून त्यांचं समुपदेशन केलं. तेव्हा कुठे मुलगा आपल्या आईला घरी घेऊन जायला तयार झाला. पण यानिमित्ताने कोरोनामुळे नात्यांमध्येच कशी ताटातूट होतेय हे याची देही याची डोळे पाहावं लागलं.

हे ही वाचा-पुण्यातील शाळेला हलगर्जीपणा भोवला, 50 टक्के स्टाफ कोरोना पॉझिटिव्ह

पण कोरोनातून जगल्या वाचल्यानंतरही आपला मुलगा आणि सून आपल्याला घरात घेत नाहीत हा अनुभव या आईसाठी खूपच धक्कादायक होता. आपल्यासोबत जे काही घडतंय ते पाहून आज्जी खरोखरच निशब्द झाली होती. ती पार खचून गेली होती. ती फक्त हुंदके देत होती तर तिचा मुलगा सासरच्या मंडळींचं कारण देत स्वतःची बाजू सावरण्याचा केविलवाणा प्रयत्न करत होता.

आज अखेर पोलीस आणि हॉस्पिटल स्टाफच्या हस्तक्षेपानंतर तिला कुटुंबीयांच्या स्वाधीन करण्यात आलं आहे. मुलगा आणि सून तिला आज घरी घेऊन गेलेत. पुढे काय होईल याबाबत आजीच्या मनात अजूनही श्वाश्वती नाहीय. पण एवढ्या सगळ्या 'नाते'वाईटातही एक स्वयंसेवी संस्था या आज्जीसाठी साडीचोळी घेऊन पुढे आली होती हेच काय ते दिलासादायक.

First published:

Tags: Corona updates, Covid-19, Maharashtra, Mother, Mumbai, Pune, Shocking news