JOIN US
मराठी बातम्या / पुणे / मोठी बातमी! पिंपरी-चिंचवड शहराचा पुन्हा रेडझोनमध्ये समावेश, प्रशासनाचे नवे आदेश

मोठी बातमी! पिंपरी-चिंचवड शहराचा पुन्हा रेडझोनमध्ये समावेश, प्रशासनाचे नवे आदेश

पुण्यातील पिंपरी-चिंचवड शहरात कोरोनाचा कहर सुरूच आहे. एका दिवसात कोरोनानं 24 जणांचा बळी घेतला.

जाहिरात
संबंधित व्हिडिओ
जाहिरात
News18 लोकमत व्हॉट्सअ‍ॅप चॅनलला फॉलो करा

पिंपरी चिंचवड, 7 ऑगस्ट: पुण्यातील पिंपरी-चिंचवड शहरात कोरोनाचा कहर सुरूच आहे. एका दिवसात कोरोनानं 24 जणांचा बळी घेतला. तर 1012 नवे रुग्ण आढळून आले. या पार्श्वभूमीवर पिंपरी-चिंचवड शहराचा पुन्हा रेडझोनमध्ये समावेश करण्यात आला आहे. नागरिकांनी गरज असेल तरच बाहेर पडावे, असं आवाहन महापालिका आयुक्त श्रावण हर्डीकर यांनी दिले आहेत. पिंपरी-चिंचवड महापालिका परिसरात कोरोनाचा विळखा आणखी घट्ट होत आहे. शहरात कोरोनाबाधित रुग्णांची संख्या 26118 वर पोहोचली आहे. तर आतापर्यंत 17673 रुग्ण कोरोनामुक्त झाले आहेत. आजपर्यंत 444 जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. हेही वाचा… महाराष्ट्र लॉकडाऊनमधून कधी मुक्त होणार आधी सांगा? प्रकाश आंबेडकरांचा रोखठोक सवाल दुसरीकडे, पुणे शहरात कोरोना संसर्गाची साखळी तोडण्यासाठी काही दिवसांपूर्वी कडक लॉकडाऊन करण्यात आला. मात्र लॉकडाऊन काळातही कोरोना रुग्णांमध्ये वाढ होत होती. त्यामुळे लॉकडाऊनच्या परिणामकारकतेवरही प्रश्नचिन्ह निर्माण करण्यात आलं. मात्र पुण्यात जुलैमधील 10 दिवसांच्या लॉकडाऊनचे आत्ता सकारात्मक परिणाम दिसू लागले आहेत. पुणे शहरात दैनंदिन रूग्णवाढीची संख्या 2 हजारांवरून थेट निम्म्याने कमी झाली आहे, मृत्यूदरातही 2.3 पर्यंत घट झाली आहे. खासगी हॉस्पिटलच्या तब्बल 280 बिलांमध्ये अनियमिता आढळून आली असून संबंधित हॉस्पिटल्सवर चौकशीअंती कारवाई होणार आहे. पुण्यात गेल्या चार दिवसांची कोरोना रुग्णांच्या आलेखावर नजर टाकली तर रूग्णवाढीची संख्या थेट निम्याने घटल्याचं दिसत आहे. विशेष म्हणजे टेस्टिंगमध्ये कुठेही कपात करण्यात आलेली नाही. तरीही दैनंदिन रूग्णवाढ आणि डिस्चार्जच्या संख्येत सकारात्मक तफावत दिसून येत आहे. पुण्यात कोरोना आटोक्यात? - रुग्ण बरे होण्याचा दर - 70टक्के - मृत्यूदरातही 4 टक्क्यांवरून 2.3 टक्क्यांपर्यंत घट - रूग्णवाढीचा दर 24 टक्क्यांवरून 18 टक्के - रुग्ण दुप्पट होण्याचा कालावधी 17 दिवसांवरून 30 दिवसांवर घसरला - दैनंदिन रूग्णवाढ 2 हजारांवरून 1 हजारांवर घसरली - पहिल्यांदाच डिस्चार्जची संख्या रूग्णवाढीपेक्षा अधिक - पुण्यात आत्तापर्यंत 3 लाख कोरोना चाचण्या हेही वाचा… पुण्यात पोलिसांच्या वेशात दरोडेखोर, ज्वेलरी शॉपवर गोळीबार करून लुटून नेलं सोनं पुण्यात डिस्चार्जची संख्या अचानक वाढण्याला खासगी हॉस्पिटलच्या आकडेवारीचा घोळच कारणीभूत असल्याचं बोललं जात आहे. त्याचीही चौकशी केली जाणार असल्याचं स्थायी समिती अध्यक्ष हेमंत रासणे यांनी म्हटलं आहे. दरम्यान, पुणे मनपाला खासगी हॉस्पिटल्सच्या तब्बल 280 बिलांमध्ये अनियमितता आढळून आल्याची माहिती अतिरिक्त आयुक्त रूबल अग्रवाल यांनी न्यूज 18 लोकमतला दिली. लॉकडाऊनमुळे पुण्यात साथ नियंत्रित झाल्याचं भासत असलं तरी ऑगस्ट महिन्याच्या अखेरीस आणखी स्पाईक येण्याची भीती प्रशासनाला सतावत आहे. त्यामुळे पुणेकरांनो काळजी घ्या… कोरोनाचं संकट अजून टळलेलं नाही, असं आवाहन करण्यात येत आहे.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.

फोटो

महत्वाच्या बातम्या