पुण्यात पोलिसांच्या वेशात दरोडेखोर, ज्वेलरी शॉपवर गोळीबार करून लुटून नेलं सोनं

पुण्यात पोलिसांच्या वेशात दरोडेखोर, ज्वेलरी शॉपवर गोळीबार करून लुटून नेलं सोनं

दरोडेखोर हे पोलिसांच्या वर्दीत गणवेश घालून स्विफ्ट गाडीतून आले होते

  • Share this:

पुणे, 6 ऑगस्ट: पुणे जिल्ह्यातील खेड शिवापूर भागात एका सराफी दुकानात भरदिवसा दरोडेखोरांच्या टोळीने घुसून गोळीबार करत सोने लुटून नेल्याचा धक्कादायक घटना समोर आली आहे. विशेष म्हणजे दरोडेखोर पोलिसांचा गणवेश घालून आले होते. यात सुदैवाने गोळी कोणाला लागली नाही. दरोडेखोर हे पोलिसांच्या वर्दीत गणवेश घालून स्विफ्ट गाडीतून आले होते, अशी माहिती ज्वेलरी शॉप मालकानं दिली आहे.

हेही वाचा..दिल्ली पुन्हा हादरली! 13 वर्षीय मुलीवर तिच्याच घरात बलात्कार करून भोसकली कात्री

मिळालेली माहिती अशी की, दरोडेखोरांनी आरोपीसोबत असल्याचं भासवून तपासासाठी दुकानात प्रवेश केला. या आरोपीनं तुम्हाला चोरीच सोनं विकलं आहे. ते सोनं द्या, असं म्हणत दुकानातलं सोनं बॅगेत भरायला सुरूवात केली. दुकानदाराला संशय आल्याने त्याने विरोध करायचा प्रयत्न केला असता दरोडेखोरांनी गोळीबार करत घटनास्थळावरून पळ काढला. ही घटना दुकानात बसवलेल्या सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाली आहे. खेड शिवापूर पोलिस पुढील तपास करत आहेत.

महिला उपसरपंचाला बर्थ डे पार्टी पडली महागात...

दरम्यान, पुणे जिल्ह्यतील खेड तालुक्यातील शिरोली गावच्या उपसरपंच महिलेने ग्रामपंचायत कार्यालयात केलेला वाढदिवस त्यांना चांगलाच महागात पडला आहे. गावात कोरोनाचे दहा रुग्ण असल्यामुळे गाव कंटेन्टमेंट झोनमध्ये असताना या उपसरपंच महिलेने सोशल डिस्टन्सचे नियम धाब्यावर बसवून वाढदिवस साजरा केल्याची खळबळजनक घटना घडली आहे.

यावरून सहकारी पण विरोधक असलेल्या माजी उपसरपंचासह 6 सदस्यांनी या उपसरपंचांच्या विरोधात गटविकास अधिकारी अजय जोशी यांच्याकडे तक्रार केली आहे. तसेच 188 कलम अंतर्गत त्यांच्यावर खटला भरण्यात आला आहे. विशेष म्हणजे या वाढदिवस कार्यक्रमाला ग्रामपंचायतीचे ग्रामसेवक सुध्दा सहभागी झाले होते.

हेही वाचा...भयंकर! मुलगी प्रियकराच्या मिठीत दिसली; जन्मदात्यांनीच दोघांना जिवंत जाळलं

जया काळूराम दसगुडे असे या उपसरपंच महिलेचे नाव आहे. शिरोली गावात कोरोनाची लागण झालेले 10 रुग्ण झाल्याने भीतीदायक वातावरण होते.अशातच उपसरपंच दसगुडे यांनी ग्रामपंचायत कार्यालयात त्यांचा वाढदिवस केक कापून साजरा केला. त्याचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल केले. त्यात काहींनी मास्क घातलेला तर काहींनी ना घालताच उपस्थिती लावल्याचे समोर आले आहे.

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर हा वाढदिवस साजरा केल्यानंतर माजी उपसरपंच जितेंद्र वाडेकर, सदस्य गणपत थीगळे, विजय सावंत, संदीप वाडेकर, सोनल सावंत, उर्मिला सावंत यांनी गटविकास अधिकारी जोशी यांच्या कडे लेखी तक्रार केली आहे.

Published by: Sandip Parolekar
First published: August 6, 2020, 7:14 PM IST

ताज्या बातम्या