JOIN US
मराठी बातम्या / पुणे / Karuna Munde Rupali Chakankar : रूपाली चाकणकर यांना हटवा, करुणा मुंडेंची थेट मुख्यमंत्र्यांकडे मागणी

Karuna Munde Rupali Chakankar : रूपाली चाकणकर यांना हटवा, करुणा मुंडेंची थेट मुख्यमंत्र्यांकडे मागणी

रुपाली चाकणकर महिला आयोगाच्या पदाचा गैरवापर करत असल्याचा आरोप करण्यात आला आहे.

जाहिरात
संबंधित व्हिडिओ
जाहिरात
News18 लोकमत व्हॉट्सअ‍ॅप चॅनलला फॉलो करा

मुंबई, 14 फेब्रुवारी : रुपाली चाकणकर महिला आयोगाच्या पदाचा गैरवापर करत असल्याचा आरोप करण्यात आला आहे. रुपाली चाकणकर यांना महिला आयोगाच्या अध्यक्षपदावरून हटवा, अशी मागणी करुणा शर्मा मुंडे यांनी केली आहे. मुंडे यांनी लेखी पत्राद्वारे मुख्यमंत्री, एकनाथ शिंदे व उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे केली आहे, तसेच केंद्रीय महिला आयोगाला देखील तक्रार दिली आहे.

या पत्रात करुणा मुंडे यांनी म्हटले आहे की, रुपाली चाकणकर त्यांच कामं निष्पक्षपातिपने करत नाहीत.या शिवाय अनेक गंभीर आरोप असलेल्या नेत्यांसोबत असलेल्या फोटो आज ही त्यांच्या फेसबुक वॉलवर दिसून येत आहेत. या शिवाय तक्रारदार महिलां आयोगात तक्रार घेऊन आल्यावर तेथून फोटो त्या व्हिडीओ प्रसारित करतात यामुळे महिलांची ओळख समाजापुढे येत आहे असंही त्यांनी म्हंटलं आहे.

हे ही वाचा :  फडणवीसांच्या गौप्यस्फोटाची संजय राऊतांनी उडवली खिल्ली, म्हणाले…

संबंधित बातम्या

पीडिता महिला त्यांच्याकडे न्यायासाठी तक्रार घेऊन येतात, त्यांना न्याय तर भेटत नाही. तर त्या महिलांसोबत फोटो आणि व्हिडिओ काढून सोशल मीडियावर व्हायरल करतात आणि राजकारण करतात. त्यामूळे उपमुख्यमंत्र्याकडे आणि केंद्रीय महिला आयोगाला ही तक्रार केली असल्याचे करुणा मुंडे यांनी यावेळी सांगितले आहे. या सर्व कारणांमुळे रुपाली चाकणकर यांची आयोगाच्या अध्यक्ष पदावरून मुक्तता करा अशी मागणी करुणा मुंडे यांनी केली आहे.

जाहिरात

रुपाली चाकणकर यांनी माध्यमात दिलेल्या विशेष मुलाखतीमध्ये आमदार होण्याची इच्छा व्यक्त केली आहे. या मुलाखतीत रुपाली चाकणकरांनी सांगितलं की, आपण 2019 मध्ये निवडणुकीच्या वेळी अजित पवारांकडे उमेदवारी अर्ज दिला होता. त्यावेळी इच्छुक उमेदवारांच्या मुलाखती होत्या, त्यात माझी मुलाखतही होणार होती.

हे ही वाचा :  सुप्रीम कोर्टात शिंदे गटाने टाकला नवा ‘पत्ता’, शिवसेनेकडून जोरदार बॅटिंग!

जाहिरात

आपल्याला खडकवासला मतदारसंघातून निवडणूक लढवायला आवडेल, असंही रुपाली चाकणकर म्हणाल्या आहेत. 2019 साली खडकवासला विधानसभा निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेसचे सचिन दोडके यांचा थोडक्यात पराभव झाला होता. राष्ट्रवादीत या मतदारसंघातून लढण्यासाठी अनेक जण इच्छुक आहेत. त्यांच्याविषयी विचारलं असता चाकणकर म्हणाल्या, स्पर्धक असेल तर काम करायला मजा येते.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.

फोटो

महत्वाच्या बातम्या