मुंबई, 14 फेब्रुवारी : ‘देवेंद्र फडणवीस जगातलं दहावं आश्चर्य आहे. आठ जगात आहेत दोन दिल्लीत बसली आहे, देवेंद्र फडणवीस धादांत खोट बोलतात. त्यांनी आपली वक्तव्य स्वत: तपासावी, असं म्हणत शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी लगावला. देवेंद्र फडणवीस यांनी शरद पवार यांच्याशी चर्चा करूनच पहाटेचा शपथविधी झाला होता, असा खुलासा केल्यामुळे एकच खळबळ उडाली आहे. संजय राऊत यांनी फडणवीसांच्या दाव्यावर प्रतिक्रिया दिली. देवेंद्र फडणवीस जगातलं दहावं आश्चर्य आहे. आठ जगात आहेत दोन दिल्लीत बसली आहे, देवेंद्र फडणवीस धादांत खोट बोलतात. 50-50 चा फॉर्म्युला त्यांनीच शाह यांच्यासमोर मांडला होता. ते अद्याप पहाटेच्या शपथविधीतून बाहेर पडलेले नाहीत. विधानपरिषदेत त्यांचा पराभव झाला. आता कसबा आणि चिंचवडमध्ये त्यांचा दारूण पराभव होणार आहे, असा दावा राऊतांनी केला. त्यामुळे आमच्या प्रतिमेबाबत त्यांनी कितीही वक्तव्य केली तरी त्याला तडा जाणार नाही. पहाटेच्या शपथविधीनं आजही त्यांना खडबडून जाग येते. लोकांना उगाच उचलून तुरूंगात टाकणं ही भाजपची नीती आहे. त्यातून त्यांनी बाहेर यावं. त्यांनी कसली भिती होती? आमचे फोन त्यांनी टॅप केले. फोनटॅप करणाऱ्या अधिकाऱ्यांची चौकशी त्यांनीच थांबवली. हे चोराच्या मनात चांदणं दिसतंय, असा टोलाही राऊतांनी फडणवीसांना लगावला. ‘महाविकास आघाडी उत्तम काम करत होती. जेलमध्ये गेलोच तर जनतेच्या मनात त्यांच्याबद्दल सॉफ्ट कॉर्नर तयार होईल ही त्यांची इच्छा आम्ही पूर्ण होऊ दिली नाही. कसले गौप्यस्फोट, जुने कोळसे उगाळत बसल्याला गौप्यस्फोट म्हणत नाही. तुमचे वायदे तुम्ही का पूर्ण केले नाहीत? हॉटेल व्ह्यू सीमधली तुमची वक्तव्य आठवा. असं काही ठरलंय नव्हतं हे बोलायचा त्यांना अधिकारच नाही. जर काही ठरलं नव्हतं तर या टेस्टट्यूब बेबींना का खांद्यावर घेता. त्यांचा पाळणा का हलवताय आता? असा सवालही राऊतांनी फडणवीसांना विचारला. आम्हालाच चिन्ह मिळणार, आम्हीच जिंकणार, असं मी बोलणार नाही. कारण ते काही ईव्हीएम नाही.की तिकडे सेटिंग होईल. मिस्टर राणेंसारखी मला ब्रेकींग न्यूचही द्यायची नाही की, चिन्ह शिंदेंनाच मिळणार, असा टोलाही राऊतांनी राणेंना लगावला. राहुल गांधींनी कोणाविरोधातही भाष्य केलेलं नाही. त्यांनी देशाविषयी काही प्रश्न विचारले. जनतेच्या पैशाबाबत त्यांनी प्रश्न विचारले. प्रश्न विचारणं हा काही गुन्हा आहे का? सर्व उपक्रम एकाच माणसाला का विकले गेले? त्यांनी उत्तर न देताच पळ काढला. याबद्दल पंतप्रधानांना हक्कभंगाची नोटीस पाठवायला हवी, असंही राऊत म्हणाले.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.