पुणे 7 जुलै: पुण्यातील कोरोना रूग्णसंख्या कमी होण्याची कोणतीही चिन्ह नसल्याने पालिका आयुक्तांनी हॉटेल्स व्यावसायिकांना परवागनी देण्याचा निर्णय तुर्तास लांबणीवर टाकला आहे. त्यामुळे पुण्यातील हॉटेल व्यवसाय तुर्तास बंदच राहणार आहे. पालिका आयुक्त शेखर गायकवाड यांची ‘न्यूज 18 लोकमत’ला माहिती दिली. शुक्रवारच्या आढावा बैठकीत अंतिम निर्णय घेणार असल्याची माहितीही त्यांनी दिली. राज्यात बुधवारपासून 30 टक्के क्षमतेने हॉटेल्स आणि लॉज उघडण्याला परवानगी मिळाली आहे. मात्र पुण्यात धोका जास्त असल्याने हा निर्णय घेण्यात आला नाही. या आधी पुण्यातली उद्याने सुरू करण्यात आली होती. मात्र तिथेही लोक गर्दी करत असल्याने तो निर्णय मागे घेण्यात आला होता. राज्यात गेले काही दिवस 6000 वर कोरोना रुग्णांची दररोज भर पडत होती. त्यामध्ये आज किंचित घट झाली. गेल्या 24 तासांमध्ये राज्यात 5134 रुग्ण आढळून आलेत. तर 224 जणांचा मृत्यू झाला. पण दिवसभरात डिस्चार्ज मिळालेल्या रुग्णांची संख्याही मोठी आहे. 3296 रुग्णांना बरं होऊन घरी सोडण्यात आलं. पुण्यात कोरोनाचा उद्रेक झाला आहे. (Pune Covid-19 patient ) दररोज कोरोना रुग्णांची संख्या वाढत आहे. पुण्याचे महापौर मुरलीधर मोहोळ यांनाही कोरोनाची लागण झाली होती. त्यानंतर माजी महापौर आणि आमदार मुक्ता टिळक यांना लागण झाल्याचं वृत्त आहे. इतरही काही पदाधिकारी आणि प्रशासकीय अधिकाऱ्यांना संसर्ग झाल्याने आता राजकीय वर्तुळात कोरोनाची धास्ती निर्माण झाली आहे. पुण्यातल्या भाजपच्या आमदार मुक्ता टिळक यांना कोरोनाची लागण राज्यातल्या एकूण रुग्णांची संख्या 2,17,121 एवढी झाली आहे. तर मृत्यूचा आकडा 9250 वर गेला आहे. Unlock नंतर Corona रुग्णांच्या संख्येत तिपटीने वाढ झाली आहे. पण मृत्यूदर फारसा वाढलेला नाही. राज्यात गेले काही दिवस 6000 वर कोरोना रुग्णांची दररोज भर पडत होती. त्यामध्ये आज किंचित घट झाली. गेल्या 24 तासांमध्ये राज्यात 5134 रुग्ण आढळून आलेत. तर 224 जणांचा मृत्यू झाला. पण दिवसभरात डिस्चार्ज मिळालेल्या रुग्णांची संख्याही मोठी आहे. 3296 रुग्णांना बरं होऊन घरी सोडण्यात आलं. पुण्यात कोरोनाला रोखण्यासाठी मोठं पाऊल, 4 नव्या IAS अधिकाऱ्यांची झाली एण्ट्री राज्यातल्या एकूण रुग्णांची संख्या 2,17,121 एवढी झाली आहे. तर मृत्यूचा आकडा 9250 वर गेला आहे. Unlock नंतर Corona रुग्णांच्या संख्येत तिपटीने वाढ झाली आहे. पण मृत्यूदर फारसा वाढलेला नाही.