जाहिरात
मराठी बातम्या / पुणे / पुण्यात कोरोनाला रोखण्यासाठी मोठं पाऊल, 4 नव्या IAS अधिकाऱ्यांची झाली एण्ट्री

पुण्यात कोरोनाला रोखण्यासाठी मोठं पाऊल, 4 नव्या IAS अधिकाऱ्यांची झाली एण्ट्री

अभ्यासानुसार कोरोना विषाणूचा RNA श्वसन प्रणालीमध्ये बराच काळ राहू शकतो आणि मलामध्ये बराच दिवस असतो. त्यामुळे संक्रमणाचा शोध लावण्यासाठी व्हायरल RNA वापरला जाऊ शकत नाही.

अभ्यासानुसार कोरोना विषाणूचा RNA श्वसन प्रणालीमध्ये बराच काळ राहू शकतो आणि मलामध्ये बराच दिवस असतो. त्यामुळे संक्रमणाचा शोध लावण्यासाठी व्हायरल RNA वापरला जाऊ शकत नाही.

भारतीय प्रशासकीय सेवेतील 4 अधिकाऱ्यांची नियुक्ती करण्यात आल्याची माहिती विभागीय आयुक्त डॉ. दीपक म्हैसेकर यांनी दिली आहे.

  • -MIN READ
  • Last Updated :

पुणे, 7 जुलै : राज्याचे उपमुख्यमंत्री तथा पुणे जिल्हयाचे पालकमंत्री अजित पवार (Ajit Pawar) यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या बैठकीमध्ये मुख्यमंत्री यांचे प्रधान सल्लागार अजोय मेहता, सार्वजनिक आरोग्य विभागाचे प्रधान सचिव प्रदीप व्यास यांनी पुणे महानगरपालिका, पिंपरी – चिंचवड महानगरपालिका, पुणे ग्रामीण व छावणी (कॅन्टोंमेंट) या सर्व क्षेत्रात कोरोना (Coronavirus) संसर्ग रोखण्यासाठी व उपाययोजनांच्या प्रभावी अंमलबजावणीसाठी भारतीय प्रशासकीय सेवेतील अधिकाऱ्यांची (IAS) नियुक्ती करण्याचे निर्देश देण्यात आले होते. त्यानुसार भारतीय प्रशासकीय सेवेतील 4 अधिकाऱ्यांची नियुक्ती करण्यात आल्याची माहिती विभागीय आयुक्त डॉ. दीपक म्हैसेकर यांनी दिली आहे. महाराष्ट्र कृषि शिक्षण व संशोधन परिषदेचे सदस्य सचिव माने यांच्याकडे पुणे महानगरपालिका, पिंपरी-चिंचवड महानगरपालिका, पुणे ग्रामीण व छावणी (कॅन्टोंमेंट) हद्दीतील कोरोना तपासणी करणा-या शासकीय तसेच खाजगी मान्यताप्राप्त लॅबवर नियंत्रण ठेवणे. या लॅबमध्ये कोरोना ( कोव्हीड-19) टेस्टची संख्या वाढविण्यासाठी आवश्यक त्या उपाययोजना करणे, तसेच या लॅबमध्ये पूर्ण क्षमतेने तपासण्या होतात किंवा नाही याची तपासणी करणे. कोरोना ( कोव्हीड-19) टेस्टचा निर्णय कळण्यासाठी लागणारा कालावधी कमीत कमी करण्यासाठी आवश्यक ती उपाययोजना करण्याबाबतची जबाबदारी देण्यात आली आहे. क्रीडा आयुक्त ओमप्रकाश बकोरिया यांच्याकडे पुणे महानगरपालिका, पिंपरी – चिंचवड महानगरपालिका, पुणे ग्रामीण व छावणी (कॅन्टोन्मेंट) हद्दीतील कोरोना ( कोव्हीड-19) विषाणूबाबत ज्या पॉझिटिव्ह रुग्ण निदर्शनास येतात, अशा व्यक्तींच्या संपर्कात येणा-या सर्व व्यक्तींना शोधून काढणे व आवश्यक ती उपाययोजना करण्याची जबाबदारी देण्यात आली आहे. आदिवासी संशोधन व प्रशिक्षण संस्थेच्या आयुक्त पवनीत कौर यांच्याकडे कोविड-19 विषाणू बाधित सर्व रुग्णांना वेळेवर बेड मिळणे आवश्यक असून रुग्णांना बेडसाठी इतरत्र फिरावे लागू नये. तसेच रुग्णांना खाजगी व शासकीय रुग्णालयांमध्ये उपलब्ध असणाऱ्या बेडबाबतची माहिती उपलब्ध होण्यासाठी व डॅशबोर्डचे संनियंत्रण करण्याची आवश्यकता आहे. तसेच हॉस्पिटलमधील बेडचे सुयोग्य पध्दतीने नियोजन व संनियंत्रण करण्याची जबाबदारी देण्यात आली आहे. कृषि आयुक्त सुहास दिवसे यांच्याकडे कोरोना ( कोव्हीड-19) विषाणूचा संसर्ग रोखण्यासाठी प्रशासनातील सर्व अधिकारी काम करत आहेत. परंतु त्यामध्ये लोकसहभाग असणे आवश्यक आहे. त्यासाठी सामाजिक संस्थांची मदत घेवून सुनियोजित पध्दतीने लोकसहभाग वाढविण्याची जबाबदारी देण्यात आल्याची माहिती विभागीय आयुक्त डॉ. दीपक म्हैसेकर यांनी दिली आहे. संपादन - अक्षय शितोळे

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
  • First Published :
जाहिरात
जाहिरात