पुण्यातल्या भाजपच्या आमदार मुक्ता टिळक यांना कोरोनाची लागण

पुण्यातल्या भाजपच्या आमदार मुक्ता टिळक यांना कोरोनाची लागण

टिळक यांना कुठलीही लक्षणे नाहीत. त्यामुळे त्या घरातच क्वारंटाइन झाल्या आहेत.

  • Share this:

पुणे 7 जुलै: पुण्याच्या भाजपच्या आमदार आणि माजी महापौर मुक्ता टिळक यांना कोरोनाची लागण झाली आहे. महापौर मुरलीधर मोहोळ यांनाही कोरोनाची बाधा झाली आहे. त्यांच्यांसोबत एका बैठकीला मुक्ता टिळक या उपस्थित होत्या. त्यामुळे त्यांनीही आपली COVID-19 टेस्ट करून घेतली. ती टेस्ट पॉझिटिव्ह आली आहे. मात्र टिळक यांना कुठलीही लक्षणे नाहीत. त्यामुळे त्या घरातच क्वारंटाइन झाल्या आहेत. मोहोळ यांच्या संपर्कात जे लोक आले होते, त्या सगळ्यांच्या टेस्ट करण्यात येत आहेत.

पुण्याचे महापौर मुरलीधर मोहोळ यांना कोरोनाची लागण झाल्यानंतर आता महापालिका वर्तुळात मोठी खळबळ उडाली आहे. महापौरांशी गेल्या चार दिवसात संपर्कात आलेल्या अनेक अधिकाऱ्यांनी आणि पुढाऱ्यांनी स्व:ताला होम क्वारंटाईन करून घेतलं आहे तर अनेक नगरसेवकही धास्तावले आहेत.

यापूर्वी महापालिकेचे सहा नगरसेवक कोरोना ने बाधित झालेत तर आतापर्यंत जवळपास 200पेक्षा अधिक कर्मचारी हे कोरोनामुळे बाधित आहेत. महापौर बाधित झाल्यानंतर आता महापालिका आयुक्त शेखर गायकवाड यांच्यासह अतिरिक्त आयुक्त रूबल अग्रवाल आणि शांतनू गोयल हेदेखील होम क्वारंटाईन आहेत.

ऑक्सफर्डची corona लस यायला 6 महिने! भारत बायोटेकप्रमाणे हीसुद्धा लस इतक्यात नाही

यापूर्वी उपमहापौर सरस्वती शेडगे यांचे पती बाधित झाले होते. मात्र, उपमहापौर बाधित नसल्याचा खुलासा आरोग्यविभागाकडून करण्यात आला होता. महापौरांच्या दालनातील 30 कर्मचाऱ्यांच्यासुद्धा कोरोना चाचण्या करण्यात आल्या. त्यापैकी 15 जणांचे रिपोर्ट निगोटिव्ह आहेत तर बाकीचे रिपोर्ट अजून प्रतीक्षेत असल्याची माहिती देण्यात आली आहे.

पुण्यात कोरोनाला रोखण्यासाठी मोठं पाऊल, 4 नव्या IAS अधिकाऱ्यांची झाली एण्ट्री

दरम्यान, नागिराकांनी नियम पाळले नाहीत ठाणे आणि नवी मुंबईप्रमाणेच पुणे शहरातदेखील कडक लॉकडाऊन जारी करण्यात येईल, असा इशारा जिल्हाधिकारी नवल किशोर राम यांनी आज ऑनलाइन पत्रकार परिषदेत दिला. ग्रामीण भागात कोरोना रुग्णांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. पुणे शहर तसंच ग्रामीण भागात अनेक नागरिक कोणत्याही कारणाशिवाय घराबाहेर मास्क न वापरता आणि प्रशासनाने घालून दिलेल्या नियमांचे पालन न करता फिरत असल्याचं निदर्शनास येत आह, असं जिल्हाधिकाऱ्यांनी सांगितलं.

Published by: Ajay Kautikwar
First published: July 7, 2020, 6:07 PM IST

ताज्या बातम्या