JOIN US
मराठी बातम्या / पुणे / Watch Video: पुण्यात बिग बास्केटच्या गोडाऊनला आग; भाजीपाला, किराणा सामान जळून खाक

Watch Video: पुण्यात बिग बास्केटच्या गोडाऊनला आग; भाजीपाला, किराणा सामान जळून खाक

पुण्यात (Pune) बिग बास्केट (Big Basket) कंपनीच्या बावधनमधील गोडाऊनला भीषण आग (Fire) लागली.

जाहिरात
संबंधित व्हिडिओ
जाहिरात
News18 लोकमत व्हॉट्सअ‍ॅप चॅनलला फॉलो करा

पुणे, 13 सप्टेंबर: पुण्यात (Pune) बिग बास्केट (Big Basket) कंपनीच्या बावधनमधील गोडाऊनला भीषण आग (Fire) लागली. यात गोडाऊनचं लाखो रुपयांचं नुकसान झाल्याची माहिती समोर येत आहे.

सोमवारी रात्री साडेअकरा वाजता बावधान बुद्रुक येथील बिग बास्केटच्या गोडाऊनला आग लागली. याआगीमध्ये धान्य, भाजीपाला, किराणा सामान जळून खाक झालं आहे. आग लागल्याची माहिती मिळताच अग्निशामनदलाचे जवान घटनास्थळी पोहोचले आणि त्यांनी आग नियंत्रणात आणली आहे.

पुणे महापालिका अग्निशमन दल, पिंपरी चिंचवड, पीएमआरडीए आणि एमआयडीसी येथील एकूण 12 फायरगाड्या आणि जवानांकडून आग विझवण्यात आली. सुदैवानं या आगीच्या दुर्घटनेत कोणीही जखमी झालेलं नाही. या आगीमध्ये लाखो रुपयांचा माल आणि गोडाऊन जळून खाक झालं आहे.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.

Tags:

फोटो

महत्वाच्या बातम्या