JOIN US
मराठी बातम्या / पुणे / जेजुरी MIDC मधील berger paints कंपनीत स्फोट, एका कामगाराचा जागीच मृत्यू

जेजुरी MIDC मधील berger paints कंपनीत स्फोट, एका कामगाराचा जागीच मृत्यू

या स्फोटामध्ये 23 वर्षीय रोहित जयवंत माने याचा जागीच मृत्यू झाला आहे. तर एक जण गंभीर जखमी झाला आहे.

जाहिरात

या स्फोटामध्ये 23 वर्षीय रोहित जयवंत माने याचा जागीच मृत्यू झाला आहे. तर एक जण गंभीर जखमी झाला आहे.

संबंधित व्हिडिओ
जाहिरात
News18 लोकमत व्हॉट्सअ‍ॅप चॅनलला फॉलो करा

बारामती, 31 डिसेंबर : सर्वत्र नववर्षाच्या स्वागातासाठी जय्यत तयारी सुरू असताना बारामतीमधील जेजुरी एमआयडीसीमध्ये एका कंपनीमध्ये स्फोट झाला आहे. या स्फोटामध्ये एका कामगाराचा मृत्यू झाला आहे. तर एक जण जखमी झाला आहे. जखमींवर पुण्यातील हॉस्पिटलमध्ये उपचार सुरू आहेत. मिळालेल्या माहितीनुसार, जेजुरी एमआयडीसीमधील बर्जर पेन्टच्या कंपनीमध्ये आज सकाळी स्फोट झाला. कंपनीमध्ये काम करत असताना अचानक स्फोट झाला. या स्फोटामध्ये 23 वर्षीय रोहित जयवंत माने याचा जागीच मृत्यू झाला आहे. तर एक जण गंभीर जखमी झाला आहे. कंपनीमध्ये अचानक स्फोट झाल्यामुळे एकच गोंधळ उडाला. इतर कर्मचाऱ्यांनी तातडीने जखमी कर्मचाऱ्याला रुग्णालयात दाखल केलं. तिथे रोहित माने याला डॉक्टरांनी तपासून मृत घोषित केलं. (Ghatkopar Video : मुंबईकर थर्टी फस्टमध्ये गुंगले अन् घाटकोपर पाण्यात बुडाले, क्षणात गेला संसार वाहून VIDEO) रोहित मानेच्या मृत्यूमुळे कर्मचारी कमालीचे संतापले होते. स्फोटामध्ये मृत्यू झालेल्या कर्मचाऱ्याच्या नातेवाईकांना कंपनीने मदत द्यावी याकरिता कर्मचाऱ्यांनी जेजुरी पोलीस स्टेशन समोर धरणे आंदोलन सुरू केले. जोपर्यंत कंपनीच्या बेजबाबदार अधिकाऱ्यांवर गुन्हा दाखल होत नाही तोपर्यंत रोहित मानेचा मृतदेह ताब्यात घेणार नाही. असा पवित्रा ग्रामस्थांनी घेतला आहे. या प्रकरणाचा पोलीस तपास करत आहे. बारामतीत शाळकरी विद्यार्थ्यांच्या बसला अपघात दरम्यान, बारामतीमध्ये सहलीहून परतणाऱ्या विद्यार्थिनींच्या बसचा अपघात झाला होता. अखेर औरंगाबाद शिर्डी सहलीवरून परत येत असताना बारामतीत अपघात झालेल्या बसमधील मुली मुलींवर उपचार करून त्यांना इचलकरंजीला सुखरूप रवाना करण्यात आले आहे. (हे ही वाचा :  Sangli : पंढरपूरला निघालेल्या भक्तांवर सिनेस्टाईल दरोडा! दगडफेक, चाकूच्या धाकाचा थरार ) अपघाताची माहिती मिळतात विरोधी पक्ष नेते अजित पवार आणि खासदार सुप्रिया सुळे यांनी तातडीने जखमी मुलींवर योग्य उपचार करण्याच्या सूचना दिल्या. गंभीर जखमी असलेल्या एका मुलीला पुण्याच्या ससून रुग्णालयात उपचारासाठी पाठविण्यात आले आहे. तर एका मुलीला रुग्णवाहिकेतून इचलकरंजीला पुढील उपचारासाठी पाठवण्यात आले आहे. राष्ट्रवादी काँग्रेसच्या पुढाकाराने मुलींसाठी शिवशाही बस उपलब्ध करून देण्यात आली. याशिवाय या मुलींना अल्पोपहार आणि गुलाब पुष्प देऊन रवाना करण्यात आले आहे.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.

फोटो

महत्वाच्या बातम्या