भोर तालुक्यातील निगडे धांगवडी येथे गुंजवणी नीरा नदीपात्रात ही घटना घडली आहे.
पुणे, 15 डिसेंबर : पुणे जिल्ह्यातून एक धक्कादायक घटना घडली आहे. नदीपात्रात पाण्याची मोटार ढकलत असताना विजेचा धक्का लागल्यामुळे एकाच शेतकरी कुटुंबातील 4 जणांचा विजेचा धक्का लागून मृत्यू झाला आहे. यामध्ये वडील आणि मुलाचाही समावेश आहे. या घटनेमुळे गावात एकच खळबळ उडाली आहे. मिळालेल्या माहितीनुसार, पुणे जिल्ह्यातील भोर तालुक्यातील नरसापुरजवळ निगडे गावात ही घटना घडली आहे. भोर तालुक्यातील निगडे धांगवडी येथे गुंजवणी नीरा नदीपात्रात ही घटना घडली आहे. पाण्यात मोटार ढकलत असताना अचानक गेलेली वीज परत आली आणि पाण्यात वीजप्रवाह उतरल्यामुळे एकाच कुटुंबातील चौघांचा विजेचा जबर धक्का बसला, त्यामुळे त्यांचा जागीच मृत्यू झाला. यामध्ये बापलेकांचा समावेश आहे. (किचन तेलंगणात अन् बेडरुम महाराष्ट्रात, दोन राज्यात विभागलंय घर; घरमालक म्हणतो, तरीही…) विठ्ठल सुदाम मालुसरे, सनी विठ्ठल मालुसरे, अमोल चंद्रकांत मालुसरे, आनंदा ज्ञानोबा जाधव (सर्व रा. निगडे ता.भोर जि. पुणे) अशी मृत्यूमुखी पडलेल्यांची नावे आहेत. या घटनेची माहिती मिळताच वीज मंडळ व पोलीस घटनास्थळी पोहोचले आहेत. कारने धडक दिल्याने तरुणाचा जागीच मृत्यू दरम्यान अमळनेर ते धरणगाव रस्त्यावरील पॉवर हाऊसजवळ पायी चालणाऱ्या तरुण व्यक्तीला प्रवाशी वाहतूक करणाऱ्या काळी-पिवळी ओम्नी गाडीने मागून धडक दिली. या अपघातात या 34 वर्षीय तरुणाचा मृत्यू झाल्याची घटना घडली. (लेकीला शेतात जाळलं अन्.., जालन्यातील बाप आणि चुलत्याचे कृत्य असे आले समोर) चोपडा येथील शेतपुऱ्यातील राजू धर्मा चव्हाण हे रात्री अमळनेर ते धरणगाव रस्त्यावरील पॉवर हाऊस जवळून पायी चालत होते. या वेळी मागून येणारी प्रवाशी वाहतूक करणाऱ्या ओम्नी व्हॅनने त्यांना जबर धडक दिली. या अपघातात चव्हाण यांना गंभीर दुखापत झाल्याने त्यांचा जागीच मृत्यू झाला. या प्रकरणी करण धर्मा चव्हाण यांनी अमळनेर पोलिसांत दिलेल्या फिर्यादीवरून ओम्नी चालक याच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.