जाहिरात
मराठी बातम्या / महाराष्ट्र / या 'पवारांचं' घर दोन्ही राज्यात, पण महाराष्ट्रात नाही तर तेलंगणाकडे आहे ओढा

या 'पवारांचं' घर दोन्ही राज्यात, पण महाराष्ट्रात नाही तर तेलंगणाकडे आहे ओढा

या 'पवारांचं' घर दोन्ही राज्यात, पण महाराष्ट्रात नाही तर तेलंगणाकडे आहे ओढा

चंद्रपूर, 16 डिसेंबर : महाराष्ट्र कर्नाटक सीमावाद अद्याप थांबलेला नाही. यातच आता तेलंगणातील काही गावांनी त्यांना वेगळं करण्यात यावं अशी मागणी केली आहे. तेलंगनाला लागून असलेल्या 14 गावांनी अशी मागणी केलीय. महाराष्ट्र कर्नाटक सीमावाद केंद्र सरकारकडे गेला असून दोन्ही राज्यांच्या नेत्यांची केंद्रीय गृहमंत्र्यांसोबत बैठकही झाली. चंद्रपूर जिल्ह्यातील महाराजगुडा हे गाव दोन राज्यांच्या सीमेवर आहे. गावात एक असंही घर आहे जे दोन्ही राज्यात आहे. दोन राज्यात विभागलेल्या या घरातील प्रमुख असणारे उत्तम पवार म्हणतात की, “आमचं कुटुंब दोन्ही राज्यात कर भरतं पण तेलंगणाकडून सर्वाधिक फायदे मिळतात.

  • -MIN READ Mumbai,Maharashtra
  • Last Updated :

चंद्रपूर, 16 डिसेंबर :  महाराष्ट्र कर्नाटक सीमावाद अद्याप थांबलेला नाही. यातच आता तेलंगणातील काही गावांनी त्यांना वेगळं करण्यात यावं अशी मागणी केली आहे. तेलंगनाला लागून असलेल्या 14 गावांनी अशी मागणी केलीय. महाराष्ट्र कर्नाटक सीमावाद केंद्र सरकारकडे गेला असून दोन्ही राज्यांच्या नेत्यांची केंद्रीय गृहमंत्र्यांसोबत बैठकही झाली. चंद्रपूर जिल्ह्यातील महाराजगुडा हे गाव दोन राज्यांच्या सीमेवर आहे. गावात एक असंही घर आहे जे दोन्ही राज्यात आहे. दोन राज्यात विभागलेल्या या घरातील प्रमुख असणारे उत्तम पवार म्हणतात की, “आमचं कुटुंब दोन्ही राज्यात कर भरतं पण तेलंगणाकडून सर्वाधिक फायदे मिळतात.” गावकऱ्यांनी असा दावा केलाय की रस्ते, पाणी यासह मुलभूत सुविधांची समस्या आहे.केसीआर यांच्या सरकारकडून चांगलं इन्फ्रास्ट्रक्चर, शाळा आणि आर्थिक मदतीची ऑफर देण्यात आली असल्याचं गावकऱ्यांनी म्हटलंय. महाराजगुडा गावातील उत्तम पवार यांचं घर दोन्ही राज्यात विभागलं आहे. त्यांच्या घराच्या भिंतीवर दोन्ही राज्यांची सीमारेषा खडूने ओढली असून रेषेच्या दोन्ही बाजूला तेलंगणा आणि महाराष्ट्र असं लिहिलं आहे. घराच्या मधोमध दोन राज्यांची सीमा असली तरी आम्हाला काही अडचण नसल्याचं उत्तम पवार यांनी म्हटलं आहे. घरमालक उत्तम पवार म्हणाले की, घरात 8 खोल्या आहेत. त्यापैकी 4 खोल्या या तेलंगणात येतात तर उरलेल्या महाराष्ट्रात आहेत. घरात आम्ही 12 ते 13 जण राहतो आणि आमचं स्वयंपाक घर हे तेलंगणात आहे. सीमा निश्चित करण्यासाठीचा सर्व्हे 1969 मध्ये झाला होता. तेव्हा आम्ही आमचं घर अर्धं महाराष्ट्रात आणि अर्धं तेलंगणात असल्याचं सांगितलं होतं. आम्हाला यामुळे काही त्रास होत नाही. आम्ही दोन्ही राज्याच्या ग्रामपंचायतीत कर भरतो आणि तेलंगणा सरकारकडून अनेक योजनांचा लाभ घेतो असंही पवार यांनी सांगितलं. हेही वाचा :  कर्नाटकच्या ‘नो एण्ट्री’वर महाराष्ट्र आक्रमक, शाहांसमोरच बोम्मईंना सवाल, फडणवीस म्हणाले… भारत-म्यानमार सीमेवर अख्खं गाव महाराष्ट्रातच नव्हे तर भारतासह जगात अनेक ठिकाणी अशी स्थिती आहे जिथं घर दोन राज्ये, देश यांच्या सीमेवर आहे. भारत - म्यानमार सीमेवर नागालँडमध्ये लोंगवा गावात असंच एक घर आहे. या घराचा अर्धा भाग हा भारतात तर उर्वरित भाग म्यानमारमध्ये आहे.  म्यानमारमध्ये आंतरराष्ट्रीय सीमा घराच्या मध्यभागातून गेली आहे. लोंगवा गावातील नागरिकांकडे दुहेरी नागरिकत्व असून ते दोन्ही देशांमध्ये ते राहू शकतात. हेही वाचा :  महाराष्ट्र-कर्नाटक सीमावाद, बैठकीमध्ये महत्त्वाचा निर्णय, अमित शाहांनी सांगितला रोडमॅप! एका घराला दोन डोअरबेल  नेदरलँड आणि बेल्जियम सीमेवरही असंच एक घर आहे. या घराला दोन डोअरबेल आहेत. घराच्या बाहेर रस्त्यावर दोन देशांची सीमारेषा दाखवणारी एक रेषा दिसते. फक्त हे एकच घर असं नाही तर याशिवाय अनेक दुकाने, कॅफे आणि रेस्टॉरंटही आहेत जी दोन्ही देशांच्या सीमारेषेवर आहेत. अमेरिका-कॅनडा सीमेवर दोन मजली इमारत अमेरिका कॅनडाच्या सीमेवर दोन मजली घराचा काही भाग हा अमेरिकेत तर काही भाग कॅनडाच्या हद्दीत आहे. 1782 मध्ये बांधण्यात आलेली ही इमारत असून यात नऊ बेडरूम आहेत. या इमारतीला ओल्ड स्टोन हाऊस म्हणून ओळखलं जातं. गेल्या काही वर्षांपासून रिकामी असलेली ही इमारत विकण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत. पण दोन देशांच्या सीमेमुळे विभागलेली ही इमारत विकण्यासाठी अद्याप कोणतीही ऑफर स्वीकारलेली नाही.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
  • First Published :
जाहिरात
जाहिरात