जालना, 15 डिसेंबर, रवी जैस्वाल : जालना जिल्ह्यातून मन हेलावून टाकणारी घटना समोर आली आहे. मुलगी पळून गेल्यानं बाप आणि चुलत्यानं मुलीला अशी भयानक शिक्षा दिली की संपूर्ण जिल्हाच हादरुन गेला. घरातून एका मुलासोबत निघून गेलेल्या अल्पवयीन मुलीची बाप आणि चुलत्यानेच गळफास देवून हत्या केली. एवढंच नव्हे तर तिचा मृतदेह परस्पर जाळून देखील टाकला. हत्येपूर्वी मारहाण घटनेबाबत अधिक माहिती अशी की ही मुलगी तीन दिवसांपासून घरातून बेपत्ता होती. जेव्हा ती घरी परतली तेव्हा तिच्या वडिलांनी तिला जाब विचारत मारहाण केली. त्यानंतर आमची बदनामी करते म्हणत बापाने आपल्या पोटच्या मुलीला शेतातील लिंबाच्या झाडाला चुलत्याच्या मदतीनं गळफास दिला. मुलीचा मृत्यू झाल्यानंतर दोघा भावांनी रात्रीच मृतदेह परस्पर जाळून टाकला. हेही वाचा : महिलेला जंगलात नेऊन साडीने बांधले अन् 3 दिवस केले अत्याचार, अमरावती हादरली आरोपींना अटक हत्या झाल्याचे कुणाला कळू नये, म्हणून त्यांनी शेतातच सरण रचून मुलीवर अंत्यसंस्कार केले. दुसऱ्या दिवशी सकाळी त्यांनी या मुलीची हाडे आणि राख एका पोत्यात भरून ती नदीत टाकायला जात असताना या प्रकरणाची माहिती पोलिसांना समजली. माहिती मिळताच पोलिसांनी शेतवस्तीवर जात गुन्हा उघडकीस आणला. या घटनेत बाप संतोष भाऊराव सरोदे आणि चुलता नामदेव भाऊराव सरोदे या दोघांना पोलिसांनी अटक केली आहे.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.