JOIN US
मराठी बातम्या / पुणे / Pune News: पुणेकरांसाठी भज्जीचा पुढाकार, अधिकाधिक कोरोना चाचण्या होण्यासाठी केली मोलाची मदत

Pune News: पुणेकरांसाठी भज्जीचा पुढाकार, अधिकाधिक कोरोना चाचण्या होण्यासाठी केली मोलाची मदत

भारताचा माजी क्रिकेटर हरभजन सिंगने (Harbhajan Singh) कोविडच्या संकटकाळात पुणेकरांना विशेष भेट दिली आहे. यामुळे आता पुण्यात कोरोना (Corona) चाचण्यांना वेग येणार आहे.

जाहिरात
संबंधित व्हिडिओ
जाहिरात
News18 लोकमत व्हॉट्सअ‍ॅप चॅनलला फॉलो करा

पुणे, 24 एप्रिल: सध्या पुणे शहरात कोरोना विषाणूचा संसर्ग (Corona pandemic) वेगाने वाढत आहे. गेल्या काही काळापासून पुण्यात दररोज चार हजारांहून अधिक कोरोना रुग्णांची भर पडत आहे. त्याचा प्रचंड ताण आरोग्य यंत्रणेसोबतचं शहरातील खासगी आणि शासकीय कोविड टेस्टिंग लॅबवर पडत आहेत. पुण्यात दिवसाला साधारणतः 20 हजार संशयित रुग्णांची कोरोना चाचणी केली जात आहे. त्यामध्ये कोरोनाची लागण होण्याचं प्रमाणही अलीकडच्या काळात वाढलं आहे. पुण्यात कोरोना चाचण्या केलेल्या रुग्णांपैकी सरासरी 20 टक्के लोकांना कोरोना विषाणूची लागण झाल्याचं निष्पन्न होतं आहे. त्यामुळे शहरात कोरोना चाचण्या वाढवण्याची गरज आहे. हीच गरज लक्षात घेऊन भारताचा माजी क्रिकेटर हरभजन सिंग (Harbhajan Singh) पुणेकरांच्या मदतीला धावला आहे. त्याने कोविडच्या संकटकाळात पुणेकरांना विशेष भेट दिली आहे. त्याने पुणे शहरासाठी मोबाइल कोविड टेस्टिंग लॅबची (फिरती कोविड टेस्टिंग लॅब) उपलब्धतता करून दिली आहे. शनिवारपासून ही सुविधा पुणेकरांच्या सेवेस हजर होणार आहे. त्यामुळे घरोघरी जाऊन कोरोना चाचणी करणं सोयीस्कर होणार आहे. ही फिरती कोविड चाचणी लॅब ‘मायलॅब डिस्कव्हरी सोल्युशन’ कडून चालवली जाणार आहे. याबाबतची माहिती देताना भाजप नेते चंद्रकांत पाटील म्हणाले की, ‘काही दिवसांपूर्वी हरभजन सिंग याने आमच्याशी संपर्क साधून कोरोना विषाणूच्या संकटकाळात ‘मोबाइल कोविड टेस्टिंग लॅब’ (Mobile Covid testing Lab)ची सुरुवात करण्याबाबत बोललं होतं. त्यानंतर आता ही सुविधा प्रत्यक्षात उतरत असून आजपासून ही सुविधा पुणेकरांच्या सेवेत हजर होणार आहे. याची सुरुवात पुण्यातील वडगाव शेरीपासून होणार आहे.’ हे ही वाचा- अजिबात चुकवू नका कोरोनाची लस! पहिल्या डोसनंतर लागण होण्याचा धोका 65% ने कमी मोबाइल कोविड टेस्टिंग लॅबची वैशिष्ट्ये दररोज दीड हजार कोरोना चाचण्या करण्याची क्षमता लॅबची असणार आहे. यामुळे अवघ्या चार तासांत RT-PCR चाचण्यांचा निकाल देता येणार आहे. संबंधित लॅबची सुविधा संपूर्ण शहरात उपलब्ध करून देण्यात येणार असून दारिद्र्य रेषेखालील लोकांची कोरोना चाचणी मोफत केली जाणार आहे. तर इतर नागरिकांकडून कोरोना चाचणीसाठी 500 रुपये आकरले जाणार आहेत. शिवाय ही मोबाइल कोविड टेस्टिंग लॅब एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी नेणे अधिक सोयीस्कर जाणार आहे. त्यामुळे एखाद्या झोपडपट्टीच्या ठिकाणी जाणंही सहज शक्य होणार आहे. त्यामुळे अधिकाधिक लोकांच्या कोरोना चाचण्या करता येणार आहेत.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.

फोटो

महत्वाच्या बातम्या