लंडन, 24 एप्रिल: सध्या जगभरात कोरोना विषाणूचा (Coronavirus) प्रसार वेगाने होतं आहे. त्यामुळे कोरोना विषाणूवर मात करण्यासाठी लस (Corona vaccination) घेणे हाच एकमेव मार्ग सध्या उपलब्ध आहे. पण कोरोना लशीबाबत अनेक लोकांमध्ये अद्यापही संभ्रमाचं वातावरण आहे. त्यामुळे कोरोना लस खरंच प्रभावी आहे का? याबाबत अनेक प्रश्न लोकांच्या मनात आहेत. पण ब्रिटनमध्ये नुकतंच यावर संशोधन (Research on vaccine) करण्यात आलं आहे. याठिकाणी झालेल्या दोन संशोधनातून दिलासा देणारी माहिती समोर आली आहे. कोरोना लशीचा पहिला डोस घेतल्यानंतर विषाणूची लागण होण्याचा धोका 65 टक्कांनी कमी होतो, अशी माहिती संशोधनातून समोर आली आहे. वैज्ञानिकांनी संशोधनात ऑक्सफोर्डची लस AstraZeneca आणि बायोएनटेकच्या Pfizer लशीचा समावेश केला होता. या दोन लशीपैकी कोणत्याही लशीचा पहिला डोस घेतल्यास संबंधित व्यक्तीला कोरोना विषाणूची लागण होण्याचा धोका 65 टक्क्यांपर्यंत कमी होतो, असा निष्कर्ष संशोधनातून समोर आला आहे. त्यामुळे कोरोना विषाणू प्रादुर्भावाच्या काळात ही आशादायक बातमी मानली जात आहे. पण या संशोधनाचा अहवाल अद्याप प्रकाशित करण्यात आला नाही. (हे वाचा- रुग्णांना भलतंच इंजेक्शन देऊन Remdesivir चोरायची नर्स, BF ब्लॅकमध्ये विकायचा ) ऑक्सफोर्ड विद्यापीठ (University of Oxford) आणि ऑफिस ऑफ नॅशनल स्टॅटिस्टिक (ओएनएस) या दोन संस्थांनी दोन वेगवेगळी संशोधनं केली आहेत. या दोन्ही संशोधनातून अशी माहिती समोर आली आहे की, कोरोना लशीच्या दोन डोसपैकी केवळ एक डोसही घेतली तरी तरुण, वयस्कर किंवा तंदुरुस्त लोकांमध्ये कोरोना विषाणूची लागण होण्याचा धोका कमी होतं असल्याचं निदर्शनास आलं आहे. असं असलं तर कोरोना लशीचे दोन डोस आवश्यक असल्याचा दावा संशोधकांनी केला आहे. संबंधित लशीच्या पहिल्या डोसनंतर दुसरा डोस 28 दिवसांनंतर देण्यात येतो. (हे वाचा- गेल्या 24 तासात देशात 2621 रुग्णांचा मृत्यू, 8 राज्यांमधील परिस्थिती गंभीर ) संबंधित दोन्ही लशी कोरोना विषाणूवर प्रभावी ठरत असल्या तरी संशोधकांनी मास्क वापरण्यासंबंधी आणि सोशल डिस्टन्सिंग पाळण्याचा सल्ला दिला आहे. कोरोना लशीबाबत अद्यापही अनेक प्रश्न अनुत्तरित आहेत. पण लशीचे दोन्ही डोस घेतले तरी कोरोना विषाणूची लागण होण्याची शक्यता नाकारता येत नाही. डोस घेतल्यानंतर भलंही तुम्हाला कोरोना विषाणूची लक्षणं नाही दिसणार, पण तुम्ही विषाणूचे वाहक बनू शकता. त्यामुळे मास्क परिधान करणे आणि सोशल डिस्टन्सिंगचा काटेकोर पालन करणं, गरजेचं असल्याचं संशोधनात नमूद करण्यात आलं आहे.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.