पुणे, 21 डिसेंबर : ख्रिश्चनधर्मियांचा वर्षातील सर्वात मोठा सण असलेला ख्रिसमस आता काही दिवसांवर येऊन ठेपला आहे. पुणे शहरात देखील या निमित्तानं उत्साह पाहायला मिळतो आहे. बाजारेपेठांसह शहरातील चर्चमध्येही ख्रिसमसची लगबग सुरू आहे. पुणे शहरातील सर्वात जुन्या चर्चचा इतिहास या निमित्तानं आपण पाहणार आहोत. ब्रिटीशांनी केली स्थापना कॅम्प परिसरातील सेंट मेरीज हे पुणे शहरातील सर्वात जुने शहर आहे. ब्रिटीशांनी मराठ्यांचा पराभव करुन पुण्यावर ताबा मिळवला त्यावेळी त्यांनी हे चर्च उभारले. हे फक्त पुणेच नाही तर डेक्कन परिसरातील सर्वात जुने चर्च असून याची ‘मदर चर्च ऑफ डेक्कन अशीही ओळख आहे. ख्रिसमससाठी पुण्यातील बाजारपेठ सज्ज, 100 रुपयांपासून आहेत शॉपिंगचे पर्याय, Video पुण्यात आणि आसपास तैनात असलेल्या ब्रिटीश सैनिकांसाठी हे चर्च बांधण्यात आले होते. हे चर्च ईस्ट इंडिया कंपनीच्या अभियंत्यांच्या लेफ्टनंट नॅशने बांधले आहे. इमारतीचा पाया 1825 मध्ये कलकत्त्याचे बिशप रेजिनाल्ड हेबर यांनी घातला होता. याबाबत या चर्चचे व्यवस्थापक स्यॅमुअल ओव्हाळ यांनी सांगितले की, ’ हे चर्च क्रॉसच्या आकारात आहे. तसंच या चर्चमध्ये दोन पातीचे पंखे आहेत. भारतामध्ये पहिल्यांदा वीज आली तेव्हापासून हे पंखे उभारण्यात आले आहेत. चर्चमध्ये सहसा कबर नसते. मात्र, या चर्चमध्ये दोन कबर आहेत. मुंबईचे तत्कानीन गव्हर्नर सर रॉबर्ट ग्रँट आणि मुंबई हायकोर्टाचे तत्कालीन चीफ जस्टिस सर एडवर्ड वेस्ट यांच्या कबरी या चर्चमध्ये आहेत,’ असे ओव्हाळ यांनी स्पष्ट केले. हा एक प्रकारे दुर्मिळ प्रकार या चर्चेमध्ये पाहायला मिळतो. स्वस्तात मस्त सहल! ख्रिसमसच्या सुट्टीत देशातल्या या ठिकाणांना नक्की भेट द्या 1823 ते 1974 या कालखंडात या चर्चमध्ये ब्रिटीश धर्मगुरू होते. 1974 नंतर भारतीय धर्मगुरू या चर्चमध्ये आहेत. या चर्चमध्ये एक अतिशय वैशिष्ट्यपूर्ण पाईप ऑर्गन आहे. 1860 साली हा या चर्चमध्ये बसण्यात आला होता. हा अतिशय वैशिष्ट्यपूर्ण पाईप ऑर्गन असून हा पाईप ऑर्गन तब्बल दहा फुटाच्या आसपास आहे. हा वाजण्यासाठी हातासोबतच पायाचा देखील वापर केला जातो.