मराठी बातम्या /बातम्या /लाइफस्टाइल /

स्वस्तात मस्त सहल! ख्रिसमसच्या सुट्टीत देशातल्या या ठिकाणांना नक्की भेट द्या

स्वस्तात मस्त सहल! ख्रिसमसच्या सुट्टीत देशातल्या या ठिकाणांना नक्की भेट द्या

ख्रिसमस सुट्ट्या कुठे साजऱ्या करायच्या

ख्रिसमस सुट्ट्या कुठे साजऱ्या करायच्या

डिसेंबर महिन्यात फिरायला जाण्याचा प्लॅन करत असाल, तर ही बातमी तुमच्यासाठी महत्त्वाची आहे. आज आम्ही तुम्हाला भारतातल्या अशा काही ठिकाणांची माहिती देणार आहोत.

  • Trending Desk
  • Last Updated :
  • Mumbai, India

नवी दिल्ली, 10 डिसेंबर : डिसेंबर महिना येताच सुट्टीची चाहूल लागते. कारण अनेक शाळांना ख्रिसमस आणि नववर्षामुळे सुट्टी असते. त्यामुळे डिसेंबरमध्ये अनेक कुटुंबं फिरायला जायचा प्लॅन करत असतात. तुम्हीही डिसेंबर महिन्यात फिरायला जाण्याचा प्लॅन करत असाल, तर ही बातमी तुमच्यासाठी महत्त्वाची आहे. आज आम्ही तुम्हाला भारतातल्या अशा काही ठिकाणांची माहिती देणार आहोत, जिथे डिसेंबर महिन्यात फिरायला जाणं खूपच आनंददायी ठरू शकतं. ‘आज तक’ने याबाबतचं वृत्त दिलं आहे.

हिमालयात सर्वसाधारणपणे 20 डिसेंबरनंतर बर्फवृष्टी सुरू होते. त्यामुळे पर्यटकांसाठी हा काळ खूप खास असतो. हिमवर्षाव सुरू असताना पर्वतरांगा परीकथांमधल्यासारख्या सुंदर दिसतात. बर्फाच्छादित उंच पर्वत, दुरून दिसणारा बर्फ आणि गोठलेल्या नद्या पाहून खूप छान वाटतं. याशिवाय इतरही अनेक ठिकाणं या काळात नयनमनोहर असतात. ख्रिसमस आणि नवीन वर्षाच्या निमित्ताने फिरायला जाण्यासारखी काही ठिकाणं जाणून घेऊ या.

गोवा : थंडी फारशी आवडत नसेल, तर ख्रिसमस आणि नवीन वर्ष साजरं करण्यासाठी गोव्यात जाऊ शकता. ख्रिसमस आणि नवीन वर्षात तिथे अनेक पार्ट्या आयोजित केल्या जातात. पार्टी करायला खूप आवडत असेल, तर गोवा या काळात पर्यटनासाठी योग्य ठिकाण आहे.

बरोग : बरोग हे हिमाचल प्रदेशातलं एक ऑफबीट डेस्टिनेशन आहे. तिथे पर्यटकांची गर्दी खूप कमी असते. बहुतांश वेळा ख्रिसमसच्या काळात तिथे बर्फवृष्टी सुरू असते. त्यामुळे ख्रिसमस आणि नवीन वर्ष साजरं करण्यासाठी हे ठिकाण योग्य ठरू शकतं. बरोगचं रेल्वे स्टेशन प्रसिद्ध आहे. युनेस्कोच्या जागतिक वारसा स्थळामध्ये त्याचा समावेश करण्यात आला आहे.

पहलगाम : काश्मीरमधल्या पहलगाममध्ये ख्रिसमसच्या आसपास खूप बर्फवृष्टी होते. त्यामुळे बर्फवृष्टी पाहण्याची खूप आवड असेल, तर तुम्ही हिवाळ्याच्या सुट्टीत येथे जाऊ शकता. तिथे बर्फाळ वातावरणात गरमागरम कॉफी पिण्याची एक वेगळीच मजा आहे.

शोघी : शोघी हे शिमल्याजवळचं एक अतिशय सुंदर ठिकाण आहे. दर वर्षी ख्रिसमसच्या काळात तिथे बर्फ पडतो. त्यामुळे या काळात तुम्ही इथे जाण्याचा विचार करत असाल तर तो तुमच्यासाठी उत्तम पर्याय ठरू शकतो. इथे गेल्यानंतर हॉट चॉकलेट, पॅनकेक्स आणि मोमोज खाण्याचा नक्की आनंद घ्या. शोघी हे शिमल्यापेक्षा सुंदर आणि शांत ठिकाण आहे. ख्रिसमसच्या सुट्टीत तुम्ही येथे भेट देऊन पर्यटनाचा आनंद घेऊ शकता.

श्रीनगर : श्रीनगरची तुलना स्वर्गाशी केली जाते. तिथे तुम्ही कोणत्याही हंगामात फिरायला जाऊ शकता. ख्रिसमस आणि नवीन वर्ष साजरं करण्यासाठी तिथे गेलात, तर संस्मरणीय ठरेल. तिथे उंच बर्फाच्छादित पर्वत, गोठलेलं दल सरोवर आणि झाडांवर गोठलेला बर्फ पाहणं, हा एक वेगळाच अनुभव असतो. दर वर्षी ख्रिसमसच्या वेळी तिथे हिवाळी कार्निव्हलही आयोजित केला जातो.

हे वाचा - Ready To Eat पदार्थांमुळे वाढतोय गंभीर आजारांचा धोका;संशोधकांचा धक्कादायक खुलासा

मुन्नार : दक्षिण भारतातील मुन्नार हे ख्रिसमस साजरा करण्यासाठीच्या सुंदर ठिकाणांपैकी एक आहे. मुन्नार डोंगराळ भागात असून, तिथे चहाच्या बागा आहेत. दक्षिण भारतात ख्रिसमसचा सण मोठ्या थाटामाटात साजरा केला जातो. अनेक सुंदर हॉटेल्सव्यतिरिक्त होम-स्टेची सुविधादेखील तिथे आहे. तिथे तुम्ही कमी बजेटमध्ये राहू शकता.

कुमारकोम : कुमारकोम हे केरळमधल्या वेम्बानद तलावाच्या काठावर वसलेलं एक छोटेसं आणि सुंदर शहर आहे. दक्षिण भारतात ख्रिसमसचा सण मोठ्या थाटामाटात साजरा केला जातो. त्यामुळे ख्रिसमस आणि नवीन वर्ष साजरे करण्यासाठी हे एक उत्तम ठिकाण ठरू शकतं.

हे वाचा - कडाक्याच्या थंडीपासून बचाव करणारं अनोखं हीटर जॅकेट; हवं असेल तर 'येथे' खरेदी करा

बिनसार : उत्तराखंडमध्ये असलेल्या बिनसारबद्दल अनेकांना अजून माहिती नाही. दिल्लीहून बिनसारला रस्त्याने पोहोचण्यासाठी 8 ते 9 तास लागतात. ख्रिसमसच्या काळात तिथे बर्फ पडतो. तिथून नंदादेवी शिखराचं दृश्य अतिशय सुंदर दिसतं. त्यामुळे हा भागही फिरण्यासाठी एक उत्तम पर्याय आहे.

या वर्षाची अखेर शनिवारी, तर नव्या वर्षाची सुरुवात रविवारी होणार आहे. त्यामुळे शाळा आणि ऑफिसेसनाही सुट्टी असेल. त्यामुळे जोडून सुट्टी घेऊन फिरायला जाण्यासाठी पर्वणी आहे.

First published:

Tags: Christmas, Tour