पुणे, 18 डिसेंबर : ख्रिस्ती बांधवांचा सर्वात मोठा सण असलेला ख्रिसमसला आता आठवडा बाकी आहे. कोरोनामुळे असलेले निर्बंध हटल्यानंतर दोन वर्षांनी यंदा मोठ्या उत्साहानं ख्रिसमस साजरा होणार आहे. पुण्याच्या बाजारपेठेत ख्रिसमसची लगबग पाहायला मिळतीय. ख्रिसमसनिमित्तानं विविध वस्तूंनी सध्या बाजारपेठ सजली आहे. काय आहे बाजारात खास? ‘आमच्या शॉपमध्ये ख्रिसमसच्या निमित्तानं यावर्षी विविध आकारांच्या कॅण्डल, चॉकलेट बॉक्स, सांताचे मुखवटे, सजावटीसाठी रंगीत बॉल, झिरमळ्या विक्रीसाठी उपलब्ध आहेत. कोरोना निर्बंधामुळे दोन वर्षांनी हा सण सार्वजनिक रित्या मोठ्या प्रमाणात साजरा होत आहे. त्यामुळे ग्राहकांची चांगली गर्दी आहे,’ अशी माहिती पुण्यातील कॅम्प परिसरातील दुकानदार ग्लोरिया यांनी दिली. फक्त 50 रुपयांपासून करा ख्रिसमची भन्नाट शॉपिंग, Video ख्रिसमस निमित्त फक्त दुकानातच नाही तर रस्त्यावर देखील वेगवेगळ्या वस्तूंनी बाजार सजला आहे. ख्रिसमसच्या निमित्तानं अक्षरशः शंभर रुपयापासून ते 5000 पर्यंत ख्रिसमस ट्री सध्या मार्केटमध्ये आहेत. या ट्रीमध्ये पण विविधता आहे. काही ट्री हिरव्या रंगाचे आहेत. तर काहींवर बर्फाची झाल असलेली सजावट आहे. काही ख्रिसमस ट्री तुम्हाला सजवण्याची गरज नाही. ते रेडीमेड स्वरूपात विक्रीसाठी आहेत. साध्या दीड फुटापासून ते आठ नऊ फुटापर्यंतचे ट्री सध्या बाजारात उपलब्ध आहेत. ख्रिसमसच्या निमित्तानं नेहमीपेक्षा वेगळ्या आकाराचे आणि विविध कलरच्या कॅन्डल पुण्याच्या बाजारात पाहायला मिळत आहेत. त्याचबरोबर सजावटीच्या साहित्यामध्ये बर्फाच्या सजावटीचे सामान सर्वांचं लक्ष वेधून घेत आहे. ख्रिसमसला प्लम केक का खाल्ला जातो? याचा इतिहास तुम्हाला माहितीय का? ‘यावर्षी आम्ही ख्रिसमस मोठ्या धुमधडाक्यात साजरा करणार आहोत. ख्रिसमसच्या सजावटीसाठी मी विविध कॅन्डल घेतले आहेत. त्यासोबतच क्रिसमस ट्री देखील घेतलेला आहे. घरी चॉकलेट बनवतो आणि ते चॉकलेट देण्यासाठी बाजारामध्ये विविध आकारांचे बॉक्सेस सध्या उपलब्ध आहेत, असे खरेदीसाठी आलेले ग्राहक साहिल मिसाळ यांनी सांगितले.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.

)







