JOIN US
मराठी बातम्या / पुणे / पुण्यात बेवारस गाडीचं रहस्य उलगडलं, वडिलांच्या हत्येसाठी मुलानेच वापरली कार!

पुण्यात बेवारस गाडीचं रहस्य उलगडलं, वडिलांच्या हत्येसाठी मुलानेच वापरली कार!

वडील, आईला योग्य वागणूक देत नव्हते. घरभाड्याचे व शेतीचे असलेले सर्व पैसे ते अनैतिक संबंध असलेल्या दुसर्‍या महिलेवर खर्च करत…

जाहिरात
संबंधित व्हिडिओ
जाहिरात
News18 लोकमत व्हॉट्सअ‍ॅप चॅनलला फॉलो करा

पुणे, 17 सप्टेंबर: शिरुर तालुक्यातील करडे घाटात अनेक दिवसांपासून एक निळ्या रंगाची बेवारस कार पडली होती. अखेर पोलीस तपासात या कारचं रहस्य उलगडलं आहे. एका मुलाने ही कार त्याच्या वडिलांच्या हत्येसाठी वापरल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. वडिलाच्या हत्येचा पुरावा नष्ट करण्याच्या उद्देशाने मृतदेहाची विल्हेवाट लावून त्यानंतर बनाव करून करडे येथील घाटात दरीत ही कार सोडून देण्यात आली होती, अशा कबुली आरोपीनं दिली आहे. हेही वाचा.. #BREAKING: पोलीस भरतीत 13 टक्के जागा मराठा समाजासाठी बाजूला काढणार-गृहमंत्री मिळालेली माहिती अशी की, पारनेर तालुक्यातील निघोज येथे कुकडी नदीपात्रात एका पत्र्याच्या कोठीमध्ये 27 ऑगस्ट रोजी अनोळखी पुरुषाचा मृतदेह आढळून आला होता. अज्ञात व्यक्तीचा खून करुन मृतदेह पेटीत घालून पुरावा नष्ट करण्याचे उद्देशाने कुकडी नदी पात्रात टाकून दिले होते. याबाबत दामु धोंडीबा घोडे (माजी सरपंच, रा. टाकळी हाजी, ता. शिरुर, जि. पुणे) यांनी पारनेर पोलिस ठाण्यात दिलेल्या फिर्यादीवरुन कलम 302, 201 प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला होता. पारनेर पोलिसांना याबाबत तपासादरम्यान 11 सप्टेंबर रोजी रांजणगाव एमआयडीसी पोलिस स्टेशन येथे मृताच्या वर्णनाशी मिळती-जुळती मिसिंग दाखल झाल्याची माहिती मिळाली. पोलिस पथकातील कर्मचार्‍यांनी रांजणगाव एमआयडीसी पोलिस ठाण्यातुन माहिती घेतली असता सतिश सदाशिव कोहकडे (वय 49, रा. कारेगांव, ता. शिरुर, जि. पुणे) हे 25 ऑगस्टपासून बेपत्ता असल्याबाबत नोंद आढळून आली. पोलिसांनी त्यांच्या नातेवाईकांशी संपर्क साधून त्यांना मृताचे कपडे, करदोरा, हातातील दोरा व मिळून आलेल्या वस्तूंचे फोटो दाखविल्यावर नातेवाईकांनी मयत हा मिसिंग व्यक्तीच असल्याचे ओळखले. ओळख पटविण्यासाठी मृताचे राखून ठेवलेले शरीराचे घटक तसेच नातेवाईकांच्या डीएनए चाचणी नियोजन करण्यात आले होते. पोलिसांना धागेदोरे मिळताच त्यांनी तपासाची चक्रे फिरवून कारेगांव येथील तांत्रिक व गोपनीय बातमीदाराच्या माहितीवरुन मृत व्यक्तीच्या मृत्यूबाबत त्याच्या मुलाकडे सखोल चौकशी केली. सुरुवातीला आरोपी मुलानं माहिती देण्यात टाळाटाळ केली. मात्र, पोलिसांनी कसून चौकशी करताच त्याने सांगितलं की,  वडील, आईला योग्य वागणूक देत नव्हते. घरभाड्याचे व शेत मालाचे सर्व पैसे ते त्यांचे अनैतिक संबंध असलेल्या दुसर्‍या महिलेवर खर्च करत. यावरुन त्याचे वडीलांशी नेहमी वाद होत असल्याचे सांगितले. 23 ऑगस्ट रोजी सायंकाळी त्याचे वडीलांशी वाद झाले. तसेच आईला मारहाण केल्याचा राग मनात धरुन आरोपी मुलगा प्रदीप सतिश कोहकडे (रा. कारेगांव, ता. शिरुर, जि. पुणे) याने त्याचे, मित्र हर्षल सुभाष कोहकडे, श्रीकांत बाळू पाटोळे (दोघेही रा. कारेगांव) यांच्यासह इतर दोन अल्पवयीन साथीदारांच्या मदतीने मयत घरामध्येच डोळ्यात मीरचीची पूड टाकून, तोंड दाबून व कापडी पट्टयाने गळा आवळून खून केल्याचे सांगितले. हेही वाचा… भरवस्तीत सुरू होता अवैध ऑईल कारखाना, अचानक भडकली भीषण आग… पाहा PHOTOS पुरावा नष्ट करण्याच्या उद्देशाने वडिलांचा मृतदेह कारमध्ये टाकून निघोज येथील कुंडावरील पुलावरुन वाहत्या पाण्यात टाकून दिले. त्यानंतर बनाव रचून कार ही शिरुर तालुक्यातील करडे येथील घाटामध्ये खाली दरीत सोडून दिल्याची कबुलीही त्याने दिली. त्यानुसार मुलासह त्याचे मित्र व अल्पवयीन आरोपींना ताब्यात घेण्यात आल्याचे पोलिसांकडून सांगण्यात आले.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.

फोटो

महत्वाच्या बातम्या