नंदूरबार जिल्ह्यातील नवापूर तालुक्यात विसरवाडी येथील न्हावी गल्ली परिसरात अवैध ऑइल बनविण्याचा कारखान्याला लागली आग. ऑईलची पॅकिंग केली जात असतानाच शॉर्टसर्किट होऊन ही आग लागल्याचं बोललं जात आहे. भरवस्तीत असलेल्या ऑईल दुकानात लागलेल्या आगीने रुद्र रूप धारण केलं असून आजूबाजूची घरे आगीच्या भक्षस्थानी सापडले आहेत. आग विझवण्यासाठी नवापूर आणि नंदुरबार शहरातून अग्निशमन दलाच्या गाड्या आल्या आहेत. आग आटोक्यात आणण्यासाठी शर्तीचे प्रयत्न सुरू आहेत. कारखान्यात ऑईलचे ड्रम्स असल्यानं आग आणखी भडकण्याची शक्यता वर्तवली जात आहे.