JOIN US
मराठी बातम्या / पुणे / Chandrakant Patil : विरोधकांनो कार्यकर्त्यांना आवरा, अन्यथा...', चंद्रकांत पाटलांच्या शाईफेकीनंतर भाजपचा इशारा

Chandrakant Patil : विरोधकांनो कार्यकर्त्यांना आवरा, अन्यथा...', चंद्रकांत पाटलांच्या शाईफेकीनंतर भाजपचा इशारा

चंद्रकांत पाटील यांच्यावर आज शाईफेक करण्यात आली आहे. यावरून आता भाजप चांगलंच आक्रमक झाले असून, थेट विरोधकांना इशारा दिला आहे.

जाहिरात

चंद्रकांत पाटलांवर शाईफेक

संबंधित व्हिडिओ
जाहिरात
News18 लोकमत व्हॉट्सअ‍ॅप चॅनलला फॉलो करा

पुणे, 10 डिसेंबर : भाजप नेते, मंत्री चंद्रकांत पाटील यांच्या वादग्रस्त वक्तव्यानंतर राजकारण चांगलचं तापलं आहे. चंद्रकांत पाटील यांच्यावर आज शाईफेक करण्यात आली आहे. चंद्रकांत पाटील पिंपरी-चिंचवडमध्ये  मोरया गोसावी महोत्सवासाठी आले होते.  ते पिंपरी चिंचवडमध्ये आपल्या एका कार्यकर्त्याच्या घरी थांबले होते. कार्यकर्त्याच्या घरून निघाल्यानंतर चंद्रकांत पाटील यांच्यावर शाईफेक करण्यात आली आहे. या प्रकरणात तीन जणांना पोलिसांनी ताब्यात घेतलं आहे. यावरून आता भाजपाचे नेते चांगलेच आक्रमक झाले आहेत. राम कदम यांनी या घटनेचा निषेध करतानाच विरोधकांना इशारा दिला आहे.

संबंधित बातम्या

नेमकं काय म्हणाले राम कदम?  ‘शाई फेकणाऱ्यांच्या घरात घुसून त्यांच्याच भाषेत त्यांना उत्तर कसं द्यायचं हे भाजपच्या कार्यकर्त्यांना चांगलं माहिती आहे. आम्ही कायदा सुव्यवस्थेचा सन्मान करणारे लोक आहोत. विरोधी पक्षांनी त्यांच्या कार्यकर्त्यांना आणि नेत्यांना आवरावे. जर आवरलं नाही आणि आमचे कार्यकर्ते तुमच्या घरात घुसले तर तुम्हाला पळता भुई थोडी होईल. घडलेला प्रकार संतापजनक आहे, अशी संतप्त प्रतिक्रिया राम कदम यांनी दिली आहे. दिलगिरी व्यक्त केल्यानंतरही शाईफेक  चंद्रकांत पाटील यांनी केलेल्या वादग्रस्त वक्तव्यानंतर राजकारण चांगलचं तापलं आहे. विरोधकांनी सरकारवर टीकेची झोड उठवली आहे. त्यानंतर चंद्रकांत  पाटील यांनी आपल्या वक्तव्याबद्दल दिलगिरी देखील व्यक्त केली. माझ्या वक्तव्यामुळे कोणाच्या भावना दुखावल्या गेल्या असतील तर मी दिलगिरी व्यक्त करतो असं पाटील यांनी म्हटलं होतं. मात्र त्यानंतरही त्यांच्यावर शाईफेक करण्यात आली आहे.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.

फोटो

महत्वाच्या बातम्या