JOIN US
मराठी बातम्या / पुणे / भयंकर! पिंपरी चिंचवडच्या मुख्य रस्त्यावर तब्बल 2 तास पडून होता वृद्धाचा मृतदेह

भयंकर! पिंपरी चिंचवडच्या मुख्य रस्त्यावर तब्बल 2 तास पडून होता वृद्धाचा मृतदेह

प्रशासनाचा ढिसाळपणा चव्हाट्यावर आणणारी घटना समोर आली आहे.

जाहिरात
संबंधित व्हिडिओ
जाहिरात
News18 लोकमत व्हॉट्सअ‍ॅप चॅनलला फॉलो करा

पिंपरी चिंचवड, 23 मे: कोरोना संसर्गाशी लढण्यासाठी डॉक्टर, नर्स, मेडिकल स्टाफ आणि पोलिस दिवसरात्र झटत आहे. सर्व यंत्रणेची मोठी कसरत सुरु आहे. या योगदानाबद्दल सर्वत्र त्यांची प्रशंसा केली जात आहे. मात्र अशातच प्रशासनाचा ढिसाळपणा चव्हाट्यावर आणणारी घटना समोर आली आहे. पिंपरी-चिंचवड शहरातील मुख्य बाजारपेठेत रस्त्यावर एका वृद्धाचा मृतदेह तब्बल दोन तास पडून होता. स्थानिक व्यापाऱ्यांनी मृतदेह नेण्यासाठी सगळीकडे फोन लावले. पण मदत पाठवण्याऐवजी उलट चौकशी करण्यातच यंत्रणेने जास्त वेळ घालावल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला. हेही वाचा..  रावसाहेब दानवेंचे जावई, माजी आमदार हर्षवर्धन जाधवांचा राजकीय संन्यास वृद्धाचा मृत्यू नेमका कधी झाला, याची कुणालाही माहिती नव्हती. पण बराच काळ झाला तरी वृद्ध व्यक्ती कोणतीही हालचाल करत नसल्याने स्थानिक व्यापाऱ्यांना व्यक्ती मृत पावल्याचा संशय आला. तर नागरिकांनी भरउन्हात निपचित पडलेल्या या देहावर छत्री लावली आणि तात्काळ संबधित यंत्रणांना फोन केला. मात्र, सुमारे दोन तास कोणतीही मदत मिळाली नसल्याने या मृतदेहाची हेळसांड झाली. शेवटी पोलिसांनी हस्तक्षेप करत महापालिका रुग्णालयातील अॅम्बुलन्स बोलावली. स्थानिक तरुणांच्या मदतीने मृतदेह अॅम्ब्युलन्स ठेऊन हॉस्पिटलमध्ये नेण्यात आला. मात्र, मृतदेह उचलणाऱ्या तरुणांना कोणतीही सुरक्षा कवच नव्हतं. धक्कादायक बाब म्हणजे हा सगळा बेजबाबदारपणा पोलिसांदेखत घडला. एकीकडे, कोरोनाबाबत पुण्यासह पिंपरी-चिंचवड परिसरातील परिस्थिती बिकट होत असताना ही बाब समोर आल्यानंतर चिंता व्यक्त करण्यात येत आहे. दरम्यान, पुण्यातील शुक्रवार पेठेत शुक्रवारी देखील अशीच घटना घडली होती. पुण्यातल्या शुक्रवार पेठेत रतन सायकल मार्ट जवळ एका अज्ञात व्यक्तीचा गेल्या तीन तासांहून अधिक काळ लोटला तरी तसाच पडून होता. यंत्रणांना वारंवार कळवल्यानंतरही तीन अ‍ॅम्ब्युलन्स येऊन गेल्या. मात्र प्रोटोकॉलचं कारण पुढे करत कुणीही मृतदेहाला हात लावलेला नाही. मृतदेह नेण्यासाठी शववाहिका बोलवावी लागेल, असं कारण देण्यात येत होतं. हेही वाचा…. Lockdown 4.0: रमजान ईदच्या पार्श्वभूमीवर राज्य सरकारनं घेतला मोठा निर्णय दरम्यान, पुणे जिल्ह्यात कोरोनाचा विळखा आणखी घट्ट होताना पाहायला मिळत आहे. शुक्रवारी दिवसभरात सर्वाधिक 358 नवे कोरोनाबधित आढळले. त्यामुळे जिल्ह्याचा एकूण कोरोनाबाधित रुग्णांचा आकडा आता 5167 झाला आहे. एकट्या पुणे शहरात तब्बल 291 कोरोना रूग्णांची वाढ झाली असून 15 जणांचा मृत्यू झाला आहे. परिणामी कोरोना बळींची संख्या 257 वर पोहोचली आहे. कोरोनाबाधित 2552 रुग्ण बरे होऊन त्यांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. तर पुणे जिल्ह्यात ॲक्टिव्ह रुग्णांची संख्या 2212 इतकी आहे.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.

फोटो

महत्वाच्या बातम्या