BREAKING: रावसाहेब दानवेंचे जावई, माजी आमदार हर्षवर्धन जाधवांचा राजकीय संन्यास

BREAKING: रावसाहेब दानवेंचे जावई, माजी आमदार हर्षवर्धन जाधवांचा राजकीय संन्यास

भाजपचे ज्येष्ठ नेते आणि केंद्रीय मंत्री रावसाहेब दानवे यांचे जावई आणि माजी आमदार हर्षवर्धन जाधव यांनी मोठा निर्णय जाहीर केला आहे.

  • Share this:

औरंगाबाद, 23 मे: भाजपचे ज्येष्ठ नेते आणि केंद्रीय मंत्री रावसाहेब दानवे यांचे जावई आणि माजी आमदार हर्षवर्धन जाधव यांनी मोठा निर्णय जाहीर केला आहे. तो म्हणजे हर्षवर्धन जाधव यांनी राजकीय संन्यास घेतला आहे. हर्षवर्धन जाधव यांनी स्वत: सोशल मीडियावरून ही माहिती दिली आहे.

हर्षवर्धन जाधव यांनी शनिवारी सोशल मीडियावर एका व्हिडिओ पोस्ट केला. या व्हिडिओच्या माध्यमातून आपण राजकीय संन्यास घेत असल्याचं हर्षवर्धन जाधव यांनी जाहीर केलं आहे. हर्षवर्धन जाधव सध्या महाबळेश्वरला एका मेडिटेशन सेंटरमध्ये असल्याची माहिती मिळाली आहे.

हेही वाचा.. Lockdown 4.0: रमजान ईदच्या पार्श्वभूमीवर राज्य सरकारनं घेतला मोठा निर्णय

सध्या लॉकडाऊन सुरु आहे. या लॉकडाऊनमध्ये अनेक जण विविध प्रकारचे छंद जोपासत आहेत. मीही आध्यात्मिक वाचनाचा छंद जोपासला. आपण विनाकारण काही गोष्टीमागे पळत राहतो, त्या कितपत खऱ्या आहेत यांची जाणीव झाली आणि त्यातून राजकारणातून निवृत्ती घेत असल्याचं हर्षवर्धन जाधव यांनी जाहीर केलं.

हर्षवर्धन जाधव म्हणाले की, पत्नी संजना जाधव ही राजकारणातील त्यांची उत्तराधिकारी  असेल. यापुढे राजकारणाशी संबंधित सगळे निर्णय तिच घेईल.   प्रत्येक घरात काही कुरबुरी होत असतात, तशा आमच्याही घरात झाल्या. मी खंबीरपणे संजना जाधव यांच्या पाठीशी उभा राहिल.

हेही वाचा.. ज्येष्ठ कामगार नेते व जितेंद्र आव्हाड यांचे सासरे डॉ. दादा सामंत यांची आत्महत्या

दरम्यान, हर्षवर्धन जाधव हे या ना त्या कारणावरुन कायम चर्चेत असतात. काही दिवसांपूर्वी हर्षवर्धन जाधव यांचा कौटुंबिक वाद चव्हाट्यावर आला होती. हर्षवर्धन जाधव यांच्या आईने सुनेविरुद्ध पोलिसांत तक्रार दाखल केली होती. तेजस्विनी जाधव यांनी सून संजना जाधव यांच्यावर शिवीगाळ आणि छळ केल्याचा आरोप केला होता. या प्रकरणी क्रांती चौक पोलिस स्टेशनमध्ये तक्रार करण्यात आली होती.

हर्षवर्धन जाधव यांच्यावर ॲट्रॉसिटीचा गुन्हा..

एका व्यक्तीला जातीवाचक शिवीगाळ केल्याप्रकरणी काही दिवसांपूर्वी हर्षवर्धन जाधव यांच्याविरुद्ध ॲट्रॉसिटीचा गुन्हा दाखल करण्यात आला होता. केंद्रीय मंत्री रावसाहेब दानवे यांनीच आपल्या मुलाविरुद्ध ॲट्रॉसिटी गुन्हा दाखल करायला लावल्याचा आरोप तेजस्विनी जाधव यांनी केला होता. आपले वडील रावसाहेब दानवे यांच्यावर करण्यात आलेला आरोप संजना जाधव यांना सहन झाला नव्हता. यावरून सासू-सुनेमध्ये वाद सुरु आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

Tags:
First Published: May 23, 2020 02:04 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading