पुणे, 19 नोव्हेंबर : बस (BUS) प्रवासात ओळख झाल्यानंतर शेजारी बसलेल्या महिलेनं चार महिन्यांच्या बाळाला पळवून नेण्याची धक्कादायक घटना पुण्यात (Pune) घडली आहे. या प्रकरणी हडपसर पोलिसांमध्ये (Hadapsar police ) गुन्हा दाखल करण्यात आला असून फरार महिलेला शोध सुरू आहे. अहमदनगर ते सातारा या मार्गावरील बस प्रवासादरम्यान झालेल्या ओळखीचा फायदा घेऊन एका महिलेने चार महिन्यांच्या बाळाचं अपहरण केले. पुण्याचा हडपसर परिसरात हा प्रकार घडला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी महिलेचे नवऱ्यासोबत भांडण झाले होते आणि याच भांडणाचा राग मनात धरून फिर्यादीने चार महिन्याचा बाळाला घेऊन घर सोडले होते. लोणी गावातील असलेली ही महिला अहमदनगरला एसटी बसने चालली होती. त्यानंतर तिने नगर ते सातारा बसने प्रवास सुरू केला. त्याचवेळी एक महिला तिच्या शेजारी सीटवर येऊन बसली. काही वेळाने महिलेने फिर्यादी यांच्याशी गप्पा मारण्यास सुरुवात केली. त्यांच्याशी ओळख वाढवून दोघीही स्वारगेट बस स्थानकात उतरल्या. त्यानंतर या महिलेनं 4 महिन्यांचे बाळ पळवून नेले. एकाला वाचवताना 2 भावांचा विहिरीत पडून मृत्यू, जालन्यातील मन सुन्न करणारी घटना या घटनेनंतर महिलेनं हडपसर पोलीस स्टेशनमध्ये धाव घेऊन तक्रार दाखल केली आहे. घटनेचे गांभीर्य लक्षात घेऊन पोलिसांनी तत्काळ या प्रकरणी गुन्हा दाखल केला आहे. पोलिसांनी एसटी बस स्थानक आणि इतर भागातील सीसीटीव्ही फुटेज तपासले असता आरोपी महिला बाळाला घेऊन जात असल्याचे दिसून आले आहे. पोलिसांनी या सीसीटीव्ही फुटेजच्या आधारे आरोपी महिलेचा शोध सुरू केला आहे.