एकाला वाचवताना 2 भावांचा विहिरीत पडून मृत्यू, जालन्यातील मन सुन्न करणारी घटना

पळसखेडा येथील ज्ञानेश्ववर जाधव, रामेशवर जाधव आणि सुनील जाधव ही तिघे भावंडे शेतातील गव्हाच्या पिकाला पाणी देण्यासाठी गेले होते.

पळसखेडा येथील ज्ञानेश्ववर जाधव, रामेशवर जाधव आणि सुनील जाधव ही तिघे भावंडे शेतातील गव्हाच्या पिकाला पाणी देण्यासाठी गेले होते.

  • Share this:
जालना, 19 नोव्हेंबर : शॉक लागून विहिरीत पडलेल्या आपल्या भावाला वाचवताना 3 सख्ख्या भावांचा दुर्दैवी मृत्यू झाल्याची ह्रदयद्रावक घटना आज उघडकीस आली. जालना (jalana) जिल्ह्यातील भोकरदन तालुक्यातील पळसखेडा गावावर यामुळे दुःखाचा डोंगर कोसळला आहे. एकाच घरातील 3 भावाचा मृत्यू झाल्यामुळे हळहळ व्यक्त केली जात आहे. पळसखेडा येथील ज्ञानेश्ववर जाधव, रामेशवर जाधव आणि सुनील जाधव ही तिघे भावंडे शेतातील गव्हाच्या पिकाला पाणी देण्यासाठी गेले होते. त्यावेळी  मोटर चालू करताना शॉक बसून एक जण विहिरीत पडला. दरम्यान, त्याला वाचविण्यासाठी इतर दोघा भावांनी देखील विहिरीत उडी घातली. पण, पोहोत येत नसल्यामुळे दोघांचाही बुडून मृत्यू झाला. या घटनेत तिघा भावांचा दुर्दैवी मृत्यू झाला. वीजेच्या खांबाला बांधून पत्रकाराला मारहाण;बेकायदेशीर गुन्हे उघड केल्यानंतर हल्ला तिघे भाऊ रात्रीपासून घरी न परतल्यामुळे कुटुंबीयांनी शोधाशोध केली असता शेतातील विहिरीत तिघे मृतावस्थेत आढळून आले. या तिघा भावांपैकी ज्ञानेश्ववर (वय 28) याच्या लग्नाला अद्याप 100 दिवस देखील पूर्ण नव्हते झाले. इतर दोघे भावंडे औरंगाबाद येथे एका खाजगी कंपनीत कामाला आहे.  लॉकडाऊन लागल्यामुळे दोघे जण सध्या गावाकडेच होती. या घटनेमुळे पळसखेडा गावावर शोककळा पसरली आहे. 55 वर्षीय प्रियकराने प्रेयसीवर केले सपासप वार, नंतर तोंडात फोडला सुतळी बॉम्ब घटनेची माहिती मिळताच राजूर पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन पंचनामा केला. तिघांचेही मृतदेह विहिरीतून बाहेर काढले असून शवविच्छेदनासाठी शासकीय रुग्णालयात पाठवले आहे. एकाच घरातील तीन भावांचा मृत्यू झाल्यामुळे गावावर शोककळा पसरली आहे. कुटुंबीयांचा आक्रोश पाहून उपस्थिती लोकांना अश्रू अनावर झाले.
Published by:sachin Salve
First published: