बॉलिवूडचा किंग खान शाहरुख खान सध्या पठाण सिनेमामुळे चर्चेत आहे. शाहरुखनंतर आता लेक आर्यन खान देखील चर्चेत आलाय.
आर्यन खान ड्रग्ज प्रकरणानंतर स्टेबल झाला. दरम्यान नव्या वर्षात आर्यन खान प्रेमात पडल्याच्या चर्चा रंगल्यात.
आर्यन खानचं नावं आधी अभिनेत्री अनन्या पांडेबरोबर जोडलं गेलं होतं. पण आर्यन अनन्याला पूर्णपणे इग्नोर केल्याचं पाहायला मिळालं.
आर्यन खान सध्या दुबईमध्ये आहे आणि दुबईत आर्यनला हॉट अभिनेत्री नोरा फतेहीबरोबर स्पॉट करण्यात आलं आहे.
आर्यन आणि नोरा रिलेशनशिपमध्ये असल्याचा चर्चांना उधाण आलं आहे. दोघांच्या कॉमन मित्रानं शेअर केलेल्या या फोटोमुळे चर्चांना उधाण आलं आहे.
नोरा आणि आर्यन खान फातिमा राजा या मैत्रिणीबरोबर दुबईमध्ये आहेत. दोघे दुबईत एकत्र कसे यावरून नेटकऱ्यांनी दोघांच्या रिलेशनच्या चर्चा सुरू केल्यात.
तर आर्यन खान देखील त्यांच्या डेब्यूसाठी तयार झाला आहे. दिग्दर्शक म्हणून तो बॉलिवूडमध्ये पदार्पण करणार असल्याचं बोललं जात आहे.