NEWS18 APP DOWNLOAD

तुमचे शहर निवडा

  • अहमदनगर
  • अकोला
  • अमरावती
  • बीड
  • छ. संभाजीनगर
  • गडचिरोली
  • गोंदिया
  • हिंगोली
  • जळगाव
  • जालना
  • कोल्हापूर
  • लातूर
  • नागपूर
  • नाशिक
  • परभणी
  • रत्नागिरी
  • सांगली
  • सोलापूर
  • ठाणे
  •  वर्धा
  • यवतमाळ
गोवा
गोवा
मुंबई
मुंबई
पुणे
पुणे
होम / फोटोगॅलरी / मनी / एक ऑगस्टपासून होणारे कोणते बदल करणार 'खिशा'वर परिणाम?

एक ऑगस्टपासून होणारे कोणते बदल करणार 'खिशा'वर परिणाम?

एक ऑगस्ट 2023पासून अनेक आर्थिक बाबींमध्ये बदल होणार आहेत. त्याचा सर्वसामान्य नागरिकांच्या आयुष्यावर परिणाम होणार आहे. त्या बाबी कोणत्या हे जाणून घेऊ या. 'एबीपी लाइव्ह'ने याबद्दलचं वृत्त दिलं आहे.

  • -MIN READ Trending Desk Mumbai,Maharashtra
    Last Updated: July 29, 2023, 22:25 IST
16

एक ऑगस्ट 2023पासून अनेक आर्थिक बाबींमध्ये बदल होणार आहेत. त्याचा सर्वसामान्य नागरिकांच्या आयुष्यावर परिणाम होणार आहे. त्या बाबी कोणत्या हे जाणून घेऊ या.

26

1. ऑगस्ट महिन्याच्या सुरुवातीलाच एलपीजी सिलिंडर अर्थात स्वयंपाकाच्या गॅसच्या दरात बदल होऊ शकतो. ते कंपन्या सर्वसाधारणपणे एक आणि 16 तारखेला गॅस सिलिंडरच्या किमतीत बदल करतात. त्याचसोबत सीएनजी आणि पीएनजीच्या दरांमध्येही बदल होऊ शकतो.

36

2. 31 जुलै 2023 ही इन्कम टॅक्स रिटर्न दाखल करण्याची शेवटची तारीख आहे. त्यामुळे या तारखेपर्यंत ज्यांनी इन्कम टॅक्स रिटर्न भरला नसेल, त्यांना एक ऑगस्टनंतर रिटर्न भरायचा असल्यास दंडाची रक्कमही भरावी लागेल. त्यामुळे सर्वांनी वेळेत इन्कम टॅक्स रिटर्न भरून दंड होणं टाळावं.

46

3. अ‍ॅक्सिस बँकेचं क्रेडिट कार्ड वापरणाऱ्या व्यक्तींसाठी सूचना आहे. अ‍ॅक्सिस बँक आणि फ्लिपकार्टवरून खरेदी करणाऱ्यांना 12 ऑगस्ट 2023पासून क्रेडिट कार्डवरून खरेदी करताना कमी कॅशबॅक मिळेल. याची ग्राहकांनी नोंद घ्यावी आणि त्यानुसारच खरेदी करावी.

56

4. स्टेट बँक ऑफ इंडियाच्या अमृत कलश योजनेत गुंतवणूक करण्याची शेवटची तारीख 15 ऑगस्ट 2023 ही आहे. ही योजना 400 दिवसांची एक खास मुदत ठेव योजना आहे. त्यात गुंतवणूक करणाऱ्या सर्वसामान्य व्यक्तींना 7.1 टक्के, तर ज्येष्ठ नागरिकांना 7.6 टक्के दराने व्याज मिळणार आहे. सध्याच्या कमी व्याजदराच्या काळात ही योजना नक्कीच चांगला परतावा देऊ शकते. शिवाय स्टेट बँकेत असल्याने फसवणुकीचा धोका नाही. त्यामुळे जास्तीत जास्त व्यक्तींनी या योजनेचा लाभ घ्यावा आणि गुंतवणूक करावी.

66

5. ऑगस्ट (2023) महिन्यात लक्षात घ्यायची सर्वांत महत्त्वाची बाब म्हणजे या महिन्यात बँका एकूण 14 दिवस बंद राहणार आहेत. त्यात शनिवार आणि रविवारच्या सुट्ट्याही समाविष्ट आहेत. एवढ्या मोठ्या प्रमाणात बँक हॉलिडे असल्याने बँकांची कामं कधी करायची, याचं नियोजन आधीपासूनच करावं लागणार आहे. अन्यथा कामं रखडू शकतात. कारण सुट्ट्या असल्याने त्यानंतरच्या दिवशी बँकांमध्ये गर्दी होऊ शकते.

  • FIRST PUBLISHED :