JOIN US
मराठी बातम्या / बातम्या / गोवा हादरलं! 3 वर्षाच्या चिमुरडीवर बलात्कार, पीडितेनं असा कथन केला प्रसंग

गोवा हादरलं! 3 वर्षाच्या चिमुरडीवर बलात्कार, पीडितेनं असा कथन केला प्रसंग

गोव्यात अवघ्या तीन वर्षाच्या चिमुरडीवर लैंगिक अत्याचार झाल्याची खळबळजनक घटना समोर आली आहे.

जाहिरात
संबंधित व्हिडिओ
जाहिरात
News18 लोकमत व्हॉट्सअ‍ॅप चॅनलला फॉलो करा

पणजी, 9 मे: गोव्यात अवघ्या तीन वर्षाच्या चिमुरडीवर लैंगिक अत्याचार झाल्याची खळबळजनक घटना समोर आली आहे. धक्कादायक म्हणजे या घटनेतील आरोपी अल्पवयीन आहे. पोलिसांनी त्याला ताब्यात घेतलं असून बालसुधारगृहात त्यांची रवानगी करण्यात आली आहे. मडगाव येथील एका मोठ्या बांधकाम प्रकल्पात सेंट्रींगचे काम करणाऱ्या कामगारांच्या वस्तीत मानवतेला काळिमा फासणारी ही घटना घडली आहे. घटनेला अशी फुटली वाचा… चिमुरडी झोपडीबाहेर एकटी खेळत होती. तिच्याजवळ कोणी नाही याचा फायदा घेत नराधमाने तिला दुसऱ्या एका झोपडीत नेलं. तिथं त्यांन तिच्यावर अत्याचार केला. दुसऱ्या दिवशी चिमुरडीला रक्तस्त्राव झाला. तिला तातडीने रुग्णालयात आणलं असता तिच्यावर अतिप्रसंग झाल्याचं निदान डॉक्टरांनी केलं. सध्या चिमुरडीवर उपचार सुरु आहेत. हेही वाचा..  VIDEO : ‘या’ देशाच्या संसदेत राडा, खासदारांमध्ये धक्काबुक्की आणि हाणामारी पीडिता अज्ञान असल्याने आरोपीपर्यंत कसं पोहोचायचं असा प्रश्न गोवा पोलिसांना पडला होता. पोलिसांनी या कामात बायलाचो एकवट संघटनेची मदत घेतली. संघटनेच्या अध्यक्षा आवदा व्हिएगस यांनी पीडितेची भेट घेतली. तिला घटनेबाबत विचारलं असता चिमुरडीने चित्र काढून तिच्यावर झालेला प्रसंग कथन केला. हे पाहून आवदा व्हिएकस यांच्यासह पोलिसही सून्न झाले आहेत. या प्रकाराबाबत आवदा व्हिएगस यांनी चिंता व्यक्त केली आहे. पोलिसांनी या घटनेतडे गांभीर्याने पाहण्याची गरज असल्याचेही त्यांनी म्हटलं आहे. हेही वाचा..  पोलिसांना कोरोना होण्याच्या प्रमाणात मोठी वाढ, गेल्या 24 तासांत सर्वाधिक रुग्ण दरम्यान, पीडितेची आई 6 महिन्यांची बाळंत आहे. ही घटना घडली तेव्हा ती घरीच होती. चिमुरडी झोपडीबाहेर आजीजवळ खेळत होती. मात्र आजी काही  कामाने गेली असता तितक्यात नराधमाने डाव साधला आणि तिला दुसऱ्या झोपडीत नेऊन तिच्यावर लैंगीक अत्याचार केला.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.

फोटो

महत्वाच्या बातम्या