• Home
 • »
 • News
 • »
 • mumbai
 • »
 • पोलिसांना कोरोना होण्याच्या प्रमाणात मोठी वाढ, गेल्या 24 तासांत सर्वाधिक रुग्ण

पोलिसांना कोरोना होण्याच्या प्रमाणात मोठी वाढ, गेल्या 24 तासांत सर्वाधिक रुग्ण

राज्यातील कोरोनाबाधित पोलिसांमध्ये 81 पोलीस अधिकारी आणि 633 पोलीस कर्मचाऱ्यांचा समावेश आहे.

 • Share this:
  मुंबई, 9 मे : महाराष्ट्राभोवती कोरोना व्हायरसचा विळखा आता आणखी घट्ट होत आहे. राज्याची राजधानी असलेल्या मुंबईसह अनेक जिल्ह्यांमध्ये दिवसेंदिवस कोरोनाबाधित रुग्णांची संख्या वाढत चालली आहे. त्यातच सर्वसामान्यांचे रक्षणकर्ते असलेल्या पोलिसांनाही कोरोनाने टार्गेट केलं आहे. महाराष्ट्र पोलिसांनी दिलेल्या ताज्या आकडेवारीनुसार, राज्यात आतापर्यंत एकूण 714 पोलिसांना कोरोनाची लागण झाली आहे. त्यातही चिंताजनक बाब म्हणजे मागील 24 तासांत 157 पोलीस कोरोनाबाधित आढळले आहेत. राज्यातील कोरोनाबाधित पोलिसांमध्ये 81 पोलीस अधिकारी आणि 633 पोलीस कर्मचाऱ्यांचा समावेश आहे. कोरोनाच्या एकूण 714 प्रकरणांमधील 648 प्रकरणे अॅक्टिव्ह असून त्यांच्यावर सध्या उपचार सुरू आहेत. तर दिलासायक बाब म्हणजे आतापर्यंत 61पोलीस कोरोनाला हरवून घरी परतले आहेत. यामध्ये 10 पोलीस अधिकारी तर 51 पोलीस कर्मचाऱ्यांच्या समावेश आहे. मात्र दुर्दैवाने कोरोनामुळे 5 पोलिसांनी आपला जीव गमावला आहे. पोलिसांचं मनोबल वाढवण्याचा सरकारचा प्रयत्न कोरोनाच्या संकटात दिवस रात्र पोलीस बांधव भगिनी हे कर्तव्य बजावत आहेत. कर्तव्य बजावत असताना अनेक पोलिसांना कोरोनाची लागण झाली आहे. तर काही पोलीसांचा मृत्यूदेखील झाला आहे. त्यामुळे पोलीसांचं मनोबल वाढवण्यासाठी व त्यांना विश्वास देण्यासाठी मंत्री आदित्य ठाकरेंनी वरळीतील पोलीसांसोबत संवाद साधला. वाचा - मुंबईत लष्कर येणार नाही, अफवांवर विश्वास ठेवू नका आदित्य ठाकरे हे वरळीचे आमदार आहेत आणि वरळीमध्ये मोठ्या प्रमाणात पोलिसांची वसाहतदेखील आहे. यामध्ये अनेक पोलीस बांधव व भगिनी सहभागी झाल्या होत्या. देशातही कोरोना रुग्णांच्या संख्येत मोठी वाढ देशात गेल्या 24 तासांत कोरोनाचे 3320 नवे रुग्ण आढळून आले आहेत. आतापर्यंतची एकूण पॉझिटिव्ह रुग्णांची संख्या 59,662 झाली असून लवकरच ती 60 हजारांचा टप्पा पार करणार असल्याची भीती व्यक्त करण्यात आली आहे. गेल्या 24 तासांत 95 कोरोनाबाधित रुग्णांचा मृत्यू झाला आहे. एकूण मृतांचा आकडा 1981 वर पोहोचला आहे. तर आतापर्यंत 17,847 रुग्ण बरे झाले असून त्यांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. ऑनलाइन क्लासमध्ये मुलाने पोस्ट केला पॉर्न PHOTO, ग्रुपवर केलं अश्लील चॅट
  Published by:Manoj Khandekar
  First published: