हाँगकाँग, 09 मे : चीन (China) समर्थक आणि लोकशाही समर्थक खासदारांमध्ये हाँगकाँगच्या संसदेत शुक्रवारी मोठा राडा झाला. याठिकाणची परिस्थिती इतकी हाताबाहेर गेली की, या खासदारांमध्ये धक्काबुक्की आणि हाणामारी देखील झाली. त्यामुळे सिक्युरिटी गार्डला बोलावून दंगा करणाऱ्या खासगारांना संसदेबाहेर काढण्यात आले. त्यानंतर अध्यक्षा ली वाय किंग यांनी संसदेचं कामकाज स्थगित केले. RT ने दिलेल्या बातमीनुसार हे सारं प्रकरण संसदेमध्ये एका महत्त्वाच्या समितीचा अध्यक्ष निवडण्यावरून झालं. या प्रक्रियेदरम्यान या सर्व राडा झाला. विरोधी पक्षातील लोकशाही समर्थक सर्व खासदारांनी असा आरोप केला की, या प्रक्रियेत खूप घाई केली गेली आहे आणि त्यामुळे त्यांना हा निर्णय मान्य नाही आहे. त्यामुळे विरोधी पक्षातील खासदारांनी संसदेत वेलमध्ये उतरत अध्यक्षांच्या खुर्चीसमोर निदर्शनं करण्यास सुरूवात केली
The @HKDemocrats's @tedhui holds up a sign that reads “Starry Lee Ultra Vires” to protest against the pro-Beijing lawmaker’s attempt to chair the upcoming special meeting. pic.twitter.com/0kBfqxty9G
— Hong Kong Free Press HKFP (@hkfp) May 8, 2020
(हे वाचा- कोण आहेत बर्नार्ड अरनॉल्ट? ज्यांचे कोरोनामुळे बुडाले 2.28 लाख कोटी ) यानंतर काही वेळातच चीन समर्थक खासदारांनी देखील विरोधकांविरोधात निदर्शने सुरू केली. याच दरम्यान दोन्ही गटांमध्ये धक्काबुक्की सुरू झाली आणि त्यानंतर त्याचे रुपांतर हाणामारीत झाले. परिस्थिती एवढी बिघडली की ली वाय किंग यांनी सुरक्षा रक्षकांना बोलावून हाणामारी करणाऱ्या खासदारांना नियंत्रणात आणण्याचे सांगितले. दरम्यान विरोधकांकडून ली वाय किंग यांनाच विरोध होत होता आणि अध्यक्ष निवडण्याच्या प्रक्रियेत घाई केल्याचा आरोप होत होता.
यानंतर चीन समर्थक खासदारांच्या प्रवक्त्याने मीडियाला अशी प्रतिक्रिया दिली की, विरोधक उगाचच हा मुद्दा उचलून धरत आहेत आणि संसदेत हिंसा करत आहेत. मिळालेल्या माहितीनुसार हाँगकाँगमध्ये ‘नॅशनल अँथेम विधेयका’चा मुद्दा देखील खूप चर्चेत आहे. यामध्ये सांगण्यात आले आहे की, कधी हाँगकाँगने कशी चीनकडून प्रेरणा घेणं आवश्यक आहे. संकलन, संपादन - जान्हवी भाटकर

)







