JOIN US
मराठी बातम्या / बातम्या / बहिणीचे अंत्यसंस्कार करून भावाचं कर्तव्य पार पाडलं, त्यानंतर ड्युटीवर परतला पोलीस

बहिणीचे अंत्यसंस्कार करून भावाचं कर्तव्य पार पाडलं, त्यानंतर ड्युटीवर परतला पोलीस

बहिणीच्या अंत्यसंस्कारासाठी वेळ काढला, भावाचं कर्तव्य पार पाडलं आणि पुन्हा देशाच्या सेवेसाठी रूजू झाले.

जाहिरात
संबंधित व्हिडिओ
जाहिरात
News18 लोकमत व्हॉट्सअ‍ॅप चॅनलला फॉलो करा

बडोदा, 19 एप्रिल : कोरोनाच्या लढ्यात पोलीस कर्मचारी अहोरात्र कर्तव्य बजावत आहेत. कुटुंबात येणाऱ्या अडचणींच्या आधी देशाची सेवा करण्याला ते प्राधान्य देत आहेत. याकाळात त्यांना कुटुंबीयांची भेटही घेता येत नाही. तर काही पोलीस कर्मचारी घरच्या लोकांना धोका म्हणून दूर राहणं पसंत करत आहेत. असे एक ना अनेक कठीण प्रसंग पोलिसांवर येत आहेत. तरीही त्यावर मात करत पोलीस देशाची सेवा करत आहेत. लॉकडाऊनच्या काळात सुरक्षेसह लोकांना आवश्यक असणारी मदत पोलीस करत आहेत. बडोदा पोलिसात असलेले असिस्टंट सब इन्स्पेक्टर अंबालला मोरारजीभाई हेसुद्धा लॉकडाऊन सुरू झाल्यापासून ड्युटीवर आहेत. हेही वाचा.. ‘या’ जिल्ह्यात पेन्शनची होम डिलिव्हरी, 29000 ज्येष्ठ नागरिकांना घरबसल्या मिळाले अंबालाल यांच्याकडे वृद्ध लोकांना मदत करण्याची ड्युटी आहे. मात्र शुक्रवारी त्यांनी ड्युटीवरून थोडावेळ सुट्टी घेतली आणि पुन्हा कामावर आले. त्यांनी बहिणीच्या अंत्यसंस्कारासाठी वेळ काढला, भावाचं कर्तव्य पार पाडलं आणि पुन्हा देशाच्या सेवेसाठी रूजू झाले. याबद्दल अंबालाल म्हणतात की,अंत्यसंस्कारासाठी उपस्थित राहून कुटुंबाला आधार दिला. भावाचं कर्तव्य पार पाडलं. पण या कोरोनाच्या संकटात एक पोलिसांचे कर्तव्यसुद्धा महत्वाचं होतं. तेच कर्तव्य आता पार पाडत आहे. हेही वाचा… VIDEO : दिशा पाटनीच्या डान्सची इंटरनेटवर धम्माल, पाहिल्यावर हटणार नाही नजर अंबालाल यांच्या बहिणीला ब्रेन हमरेजचा त्रास होता. बहिणीचा रक्तदाब अचानक वाढला आणि त्यातच मृत्यू झाला. कुटुंबाचं सांत्वन करून अंबालाल पुन्हा ड्युटीवर हजर झाले. सिनियर सिटीझनच्या सेलमध्ये अंबालाल करटीव्ही बजावत आहेत. यामध्ये शहरातील ज्येष्ठ नागरिकांना येणाऱ्या अडचणी सोडवण्यासाठी ते मदत करतात. कोणाला औषध, कोणाला जेवण किंवा इतर मदतीची गरज असते. ते पोहोचवण्याची जबाबदारी त्यांच्याकडे आहे. संपादन- सूरज यादव

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.

फोटो

महत्वाच्या बातम्या